Join us

अ‍ॅशेस 2019 : इंग्लंडला मोठा धक्का; प्रमुख गोलंदाजाची दुखापतीमुळे लॉर्ड्स कसोटीतून माघार

मालिकेतील पहिल्या सामन्यावर ऑस्ट्रेलियाने मोहोर उमटवली. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो स्टीव्हन स्मिथ.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 14:55 IST

Open in App

बर्मिंगहॅम, अ‍ॅशेस 2019 : मालिकेतील पहिल्या सामन्यावर ऑस्ट्रेलियाने मोहोर उमटवली. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो स्टीव्हन स्मिथ. कारण या सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला नॅथन लिऑनने सहा विकेट्स घेत खिंडार पाडले आणि ऑस्ट्रेलियाने 251 धावांनी हा सामना जिंकला. पाच सामन्यांच्या मालिकेत यजमान इंग्लंडचा संघ 0-1 असा पिछाडीवर गेला आहे. त्यामुळे 14 ऑगस्टपासून लॉर्ड्सवर सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा पुनरागमनाचा प्रयत्न आहे.

त्यांच्या या निर्धाराला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा प्रमुख गोलंदाज जेम्स अँडरसन दुखापतीतून सावरला नाही, त्यामुळे त्याने दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात केवळ चार षटकं टाकून अँडरसन मैदनाबाहेर गेला होता. त्याच्या पोटरीला दुखापत झाली होती आणि MRIच्या अहवालात ही दुखापत बरी झाली नसल्याचे उघड झाले. 

टॅग्स :अ‍ॅशेस 2019जेम्स अँडरसनइंग्लंडआॅस्ट्रेलिया