Join us

KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी

इंग्लंडच्या संघात स्थान मिळालेल्या पठ्याचा भारत अ संघाविरुद्ध भेदक मारा, आघाडीच्या तिघांना स्वस्तात धाडलं तंबूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 19:59 IST

Open in App

England Lions vs India A, 2nd Unofficial Test : इंग्लंड दौऱ्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्याआधी भारतीय 'अ' संघ इंग्लंड लायन्स विरुद्ध दुसरा अनौपचारिक कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारतीय 'अ' संघाची सुरुवात एकदम खराब झालीये. सलामीवीर यशस्वी जैस्वालसह कर्णधार अभिमन्यू ईश्वरन आणि करुण नायर स्वस्तात माघारी फिरले आहेत. इंग्लंडच्या संघाने टीम इंडियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी नुकताच आपला संघ जाहीर केला. या संघात क्रिस वोक्सनं कमबॅ केले आहे. टीम इंडियाविरुद्ध मैदानात उतरण्याआधी त्याने इंग्लंड लायन्सच्या ताफ्यातून मैदानात उतरत भारतीय फलंदाजांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. भेदक माऱ्यासह आघाडी फलंदाजीला सुरुंग लावून त्याने टीम इंडियाचे टेन्शन वाढवले आहे.   

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

क्रिस वोक्सचा जलवा, यशस्वीसह द्विशतकवीर करुण नायरनंही टाकली नांगी 

इंग्लंड लायन्स विरुद्धच्या दुसऱ्या अनौपचारिक सामन्यात यशस्वी जैस्वालसहलोकेश राहुलनं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल २६ चेंडूत १७ धावा करून माघारी फिरला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या अभिमन्यू ईश्वरन यानेही ११ धावांवर आपली वकेट गमावली. पहिल्या अनौपचारिक कसोटी सामन्यात द्विशतकी खेळी करणाऱ्या करून नायरनं केएल राहुलच्या साथीनं डाव सावरला. पण तो४० धावांवर बाद झाला. क्रिस वोक्सनं दिलेल्या या तीन धक्क्यामुळे भारतीय अ संघाने १२६ धावांत तीन विकेट्स गमावल्याचे पाहायला मिळाले.

KL राहुलची कडक खेळी

आयपीएलच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून दमदार कामगिरी केल्यावर लोकेश राहुल भारतीय 'अ' संघाकडून खेळण्यासाठी टीम इंडियातील अन्य खेळाडूंच्या आधी इंग्लंडला पोहचला होता. इंग्लंड लायन्स विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात डावाला सुरुवात करताना त्याने कडक अर्धशतकी खेळी करून टीम इंडियासाठी दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. आघाडीच्या फळीतील अन्य फलंदाज ठराविक अंतराने माघारी फिरल्यावर त्याने आश्वासक खेळीसह आपल्यातील क्लास दाखवला.    

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५लोकेश राहुलयशस्वी जैस्वालभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध इंग्लंड