Virat Kohli: कोहलीचा हा सर्वात मोठा 'दुश्मन', आता बनलाय त्याचा चाहता; म्हणाला - विराट पूर्वीपेक्षा अधिक घातक

"विराट आता पूर्वीपेक्षाही अधिक घातक झाला असून येणाऱ्या काळात आपल्याला त्याचे अधिक चांगले प्रदर्शन बघायला मिळेल..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 01:04 PM2022-11-29T13:04:17+5:302022-11-29T13:07:37+5:30

whatsapp join usJoin us
england cricketer moeen ali statement on virat kohli Said Virat is more dangerous than before | Virat Kohli: कोहलीचा हा सर्वात मोठा 'दुश्मन', आता बनलाय त्याचा चाहता; म्हणाला - विराट पूर्वीपेक्षा अधिक घातक

Virat Kohli: कोहलीचा हा सर्वात मोठा 'दुश्मन', आता बनलाय त्याचा चाहता; म्हणाला - विराट पूर्वीपेक्षा अधिक घातक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज असलेल्या विराट कोहलीचा सर्वात मोठा 'दुश्मन' आता त्याचा चाहता बनला आहे. विराट कोहलीचा हा सर्वात मोठा दुश्मन दुसरा-तिसरा कुणी नसून, इंग्लंड संघाचा ऑफस्पिन ऑलराउंडर मोईन अली हा आहे. आता विराट पूर्वीपेक्षाही अधिक खतरनाक झाला असल्याचे मोइन अलीने म्हटले आहे.

सध्या मोईन अली हा क्रिकेटच्या मैदानात विराट कोहलीसाठी सर्वात मोठा दुश्मन ठरत आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मोईन अलीने विराट कोहलीला तब्बल 10 वेळा बाद केले आहे. विराट आता पूर्वीपेक्षाही अधिक घातक झाला असून येणाऱ्या काळात आपल्याला त्याचे अधिक चांगले प्रदर्शन बघायला मिळेल, असे मोईन अलीने म्हटले आहे. 

विराट पूर्वीपेक्षा अधिक घातक -
मोईन अली म्हणाला, 'विराट कोहली सारख्या दिग्गज खेळाडूला पुनरागमन करताना पाहणे, अत्यंत आनंददायी आहे. विराट कोहलीने पुनरागमन केले आहे आणि तो ज्या पद्धतीने खेळत आहे, ते आनंददाई आहे. विराट कोहलीने आशिया कपमध्ये काही चांगले शॉट्स खेळले होते. तेव्हाच तो टी-20 विश्वचषकात घातक ठरणार, हे मी ओळखले होते. तसेच, येणाऱ्या काळात त्याच्या कडून चांगल्या खेळी बघायला मिळतील, असेही त्याने म्हटले आहे.  
 

Web Title: england cricketer moeen ali statement on virat kohli Said Virat is more dangerous than before

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.