Join us

बेन स्टोक्स निर्दोष; तरीही तिसऱ्या सामन्यात संधी नाही

स्टोक्सला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले असले तरी त्याला भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळता येणार नाही, असे म्हटले जात आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 18:56 IST

Open in App
ठळक मुद्देन्यायालयाने सर्व पुरावे पडताळून पाहिल्यावर स्टोक्सची याप्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे.

ब्रिस्टल : नाईटक्लब बाहेर झालेल्या हाणामारीप्रकरणी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. स्टोक्सला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले असले तरी त्याला भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळता येणार नाही, असे म्हटले जात आहे. 

गेल्या वर्षी नाईटक्लबमध्ये झालेल्या हाणामारीनंतर स्टोक्सवर खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी आज संपली. या सुवानवणीच्या वेळी फिर्यादी पक्षाचे वकिल निकोलस कोर्सेलिन यांनी स्टोक्सवर काही आरोप केले आहेत. पण या आरोप बिनबुडाचे असल्याचे स्टोक्सने म्हटले होते. न्यायालयाने सर्व पुरावे पडताळून पाहिल्यावर स्टोक्सची याप्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे.

स्टोक्सला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले असले तरी त्याला संघात थेट घेण्यात येणार नाही, असे म्हटले जात आहे. कारण आता इंग्लंड क्रिकेट मंडळाची शिस्तपालन समिती स्थापन करण्यात येईल. या समितीपुढे स्टोक्सला आपली बाजू मांडावी लागेल. त्यानंतर ही समिती क्रिकेट मंडळाला आपला अहवाल सादर करेल. त्यामध्ये जर स्टोक्स दोषी आढळला नाही तर त्याला संघात स्थान देण्यात येईल.

टॅग्स :बेन स्टोक्सइंग्लंडभारत