Join us

अ‍ॅशेस मालिका : वर्ल्ड कप गाजवणाऱ्या गोलंदाजाला इंग्लंडच्या संघात स्थान नाही

वर्ल्ड कप स्पर्धेतील जेतेपदानंतर इंग्लंड संघाने पारंपरिक अ‍ॅशेस मालिकेसाठी दंड थोपटले आहेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 18:19 IST

Open in App

लंडनः वर्ल्ड कप स्पर्धेतील जेतेपदानंतर इंग्लंड संघाने पारंपरिक अ‍ॅशेस मालिकेसाठी दंड थोपटले आहेत. गुरुवारपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाने अंतिम 11 सदस्यीय संघ जाहीर केला. पण, या संघात वर्ल्ड कपमधील इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज जोफ्रा आर्चरला संधी मिळालेली नाही. त्याच्यासह सॅम कुरन आणि ऑली स्टोन यांना अंतिम अकरामध्ये स्थान पटकावता आलेले नाही. कर्णधार जो रूटने हा संघ जाहीर केला.

अ‍ॅशेस मालिकेचे जेतेपद सध्या ऑस्ट्रेलियाकडे आहे. त्यांनी 2017-18ची मालिका 4-0 अशी जिंकली होती. त्यामुळे घरच्या मैदानावर पुन्हा अ‍ॅशेस जिंकण्याचा इंग्लंडचा निर्धार आहे. 

इंग्लंडचे अंतिम अकराः रोरी बर्न्स, जेसन रॉय, जो रूट, जोए डेन्ली, जॉस बटलर, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, ख्रिस वोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन अ‍ॅशेस मालिकेचे वेळापत्रकपहिली कसोटी - 1 ते 5 ऑगस्ट, एडबॅस्टन, बर्मिंगहॅमदुसरी कसोटी - 14 ते 18 ऑगस्ट, लॉर्ड्स, लंडनतिसरी कसोटी - 22 ते 26 ऑगस्ट, हेडिंग्ली, लीड्सचौथी कसोटी - 4 ते 8 सप्टेंबर, ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टरपाचवी कसोटी - 12 ते 16 सप्टेंबर, ओव्हल, लंडन

टॅग्स :इंग्लंडआॅस्ट्रेलिया