ENG vs SA 2nd T20I : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेने जबरदस्त खेळ केला. ६ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणाऱ्या आफ्रिकेच्या रिली रोसोवूने ( Rilee Rossouw ) इंग्लंडच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. २० षटके संपल्यामुळे त्याला ४ धावांनी शतक करता नाही आले. त्याने १५ चेंडूवर ७० धावांचा पाऊस पाडून आफ्रिकेला २०० पार पोहोचवलं.
क्विंटन डी कॉक १५ धावा करून माघारी परतल्यावर रिझा हेंड्रीक व रोसोवू यांनी दमदार फटकेबाजी केली. दुसऱ्या विकेटसाठी त्यांनी ७१ धावा जोडल्या. रिझा ३२ चेंडूवर ३ चौकार व २ षटकार मारून ५३ धावांवर बाद झाला. जॉनी बेअरस्टोने अफलातून झेल टिपला त्यानंतर रोसोवूचे वादळ घोंगावले. १२ व्या षटकापासून त्याने तूफान फटकेबाजी केली.
![]()
रोसोवूने ५५ चेंडूत नाबाद ९६ धावा केल्या. १० चौकार व ५ षटकार अशा ७० धावा तर त्याने १५ चेंडूतच कूटल्या. आफ्रिकेने ३ बाद २०७ धावा केल्या. आफ्रिकेच्या खेळाडूची इंग्लंड विरुद्धची ट्वेन्टी-२० तील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. यापूर्वी रॅसी व्हॅन डर ड्युसनने शारजात नाबाद ९४ धावा केल्या होत्या. कार्डिफवरील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम नावावर करताना रोसोवूने ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथचा ९० ( वि. इंग्लंड, २०१५) धावांचा विक्रम मोडला.
Web Title: ENG vs SA 2nd T20I : Rilee Rossouw playing his International series after 6 long years, he smashed 96* from just 55 balls including 10 fours and 5 sixes against England
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.