Join us

ENG vs PAK : इंग्लंडच्या धरतीवर बाबरची सटकली; पाकिस्तानी कर्णधार अन् चाहत्यामध्ये जुंपली

ट्वेंटी-२० मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 14:27 IST

Open in App

ENG vs PAK T20 : चार ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाहुण्या पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानी संघाची धुरा पुन्हा एकदा बाबर आझमकडे आहे. सध्या बाबरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका चाहत्याला फटकारताना दिसत आहे. सतत सेल्फीसाठी आग्रह करणाऱ्या चाहत्याला पाकिस्तानी कर्णधाराने सुनावल्याचे दिसते. हा व्हिडीओ इंग्लंडच्या धरतीवरील असून, बाबर फावल्या वेळात त्याच्या वाहनाने प्रवास करत असतानाचा आहे.

बाबर आझमच्याच नेतृत्वात पाकिस्तान ट्वेंटी-२० विश्वचषक खेळणार आहे. आगामी स्पर्धेसाठी शेजाऱ्यांनी आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला असून, राखीव खेळाडू म्हणून कोणालाच संधी दिली नाही. उप कर्णधारपद देखील कोणालाच देण्यात आले नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा परतलेले मोहम्मद आमिर आणि इमाद वसीम यांना विश्वचषकाच्या संघात स्थान मिळाले आहे. 

चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रद्द झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मग आव्हानाचा पाठलाग करताना पाहुण्या पाकिस्तानला घाम फुटला अन् २३ धावांनी पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित २० षटकांत ७ बाद १८३ धावा केल्या. कर्णधार जोस बटलरने सर्वाधिक धावा करताना ५१ चेंडूत ८४ धावा कुटल्या. त्याने ३ षटकार आणि ८ चौकार लगावले. त्याच्याशिवाय विल जॅक्सने ३७ धावांची खेळी केली. इंग्लंडने दिलेल्या १८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला नेहमीप्रमाणे संथ खेळीचा फटका बसला. कर्णधार बाबर आझमने २६ चेंडूत ३२ धावा केल्या, मग फखर झमानने २१ चेंडूत ४५ धावा करून सामन्यात रंगत आणली. पण, इंग्लंडच्या घातक गोलंदाजीसमोर पाकिस्तान निर्धारित २० षटके देखील खेळू शकला नाही. अखेर पाहुण्या संघाने १९.२ षटकांत सर्वबाद केवळ १६० धावा केल्या आणि सामना २३ धावांनी गमावला. 

पाकिस्तानचा विश्वचषकासाठी संघ -बाबर आझम (कर्णधार), अब्रार अहमद, आझम खान, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वासीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शाबाद खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.

टॅग्स :बाबर आजमऑफ द फिल्डपाकिस्तानइंग्लंडसोशल व्हायरल