New Zealand vs England, 2nd T20I : इंग्लंडचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत व्यग्र आहे. पहिल्या सामना पावसामुळे रद्द झाल्यावर इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या सामन्यात यजमान न्यूझीलंडला पराभवाचा दणका देत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना फिल सॉल्ट आणि हॅरी ब्रूक यांनी तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश केला. त्यांच्या वादळी खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात २३६ धावा केल्या होत्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
न्यूझीलंडच्या ताफ्यातील सगळे झेलबाद, T20I मध्ये १३ व्या वेळी असं घडलं
न्यूझीलंडच्या क्राइस्ट-चर्चच्या मैदानात टी-२० क्रिकेटमधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ १७१ धावांत आटोपला. विशेष म्हणजे न्यूझीलंडच्या संघातील सर्व फलंदाज झेलबादच्या रुपात बाद झाल्याचे पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट सामन्यात १३ व्या वेळी एखाद्या सामन्यातील एका डावात सर्वच्या सर्व १० गडी झेलबाद झाल्याचे पाहायला मिळाले.
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, “पुढे दोघांनी ही गोष्ट केली तरी आश्चर्यचकित होऊ नका!
फिल सॉल्ट आणि हॅरी ब्रूकचा जलवा
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर फिल सॉल्ट आणि मध्यफळीत फलंदाजीला आलेल्या हॅरी ब्रूकनं वादळी खेळीसह त्याचा हा निर्णय चुकीचा ठरवला. इंग्लंडच्या डावाची सुरुवात करणाऱ्या सॉल्टनं ५६ चेंडूत ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ८५ धावांची खेळी केली. त्याचं शतक अवघ्या १५ धावांनी हुकलं. याशिवाय इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक याने ३५ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने ७८ धावांची धमाकेदार इनिंग खेळली. या दोघांशिवाय अखेरच्या षटकात टॉम बँटन याने १२ चेंडूतील २९ धावा कुटल्याचे पाहायला मिळाले.
विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना यजमान न्यूझीलंड संघ गडबडला
यजमान न्यूझीलंडचा संघ घरच्या मैदानातील विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना गडबडला. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना किवींच्या ताफ्यातून सलामीवीर टिम सिफर्टनं केलेल्या ३९ धावा आणि मार्क चॅम्पमॅनच्या २८ धावा वगळता अन्य कोणत्याही बॅटरला मोठी खेळी करता आली नाही. न्यूझीलंडच्या संघ १८ व्या षटकात १७१ धावांवर ऑलआउट झाला. इंग्लंडच्या ताफ्यातून आदिल रशीद याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. याशिवाय ल्यूक वूड, ब्रायडन कार्स आणि लियाम डसन यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या.