Join us

ENG vs NZ: कॅच घेतल्याचा दावा केल्यामुळे केन विलियमसनने जोस बटलरची मागितली माफी!   

सध्या टी-20 विश्वचषकात न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सामना खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 14:21 IST

Open in App

ब्रिस्बेन : सध्या टी-20 विश्वचषकात न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सामना खेळवला जात आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लिश संघाने आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत शानदार सुरूवात केली आहे. 10.1 षटकांपर्यंत इंग्लिश संघाने एकही गडी न गमावता 81 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने पॉवरप्लेच्या षटकांमध्ये एक शानदार झेल घेतला. सर्व किवी संघाचे खेळाडूंनी पहिला बळी मिळाल्याने जल्लोष केला. मात्र चेंडूचा जमिनीला स्पर्श झाला होता हे लक्षात येताच केन विलियमसनने इंग्लिश संघाचा कर्णधार जोस बटलरची माफी मागितली. विलियमसनच्या या कृत्यामुळे अनेकांची मनं जिंकली आहेत. 

खरं तर विलियमसनने मिचले सॅंटनरच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर शानदार झेल पकडला. नंतर किवी संघाचे खेळाडू एकच जल्लोष करू लागले. मात्र चेंडू जमिनीला स्पर्श झाला असल्यामुळे विलियमसनने बटलरची माफी मागितली. इंग्लिश संघाने 10.1 षटकांपर्यंत एकही गडी न गमावता 81 धावा केल्या आहेत. 

आजच्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ -

आजच्या सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ - 

 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२इंग्लंडन्यूझीलंडकेन विल्यमसनजोस बटलर
Open in App