Eng vs Ire : 116 आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर मिळाली कसोटी पदार्पणाची संधी अन् 

क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यानंतर इंग्लंडचा संघ प्रथमच मैदानात उतरला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील एकमेव चारदिवसीय कसोटी सामन्याला लॉर्ड्सवर सुरुवात झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 04:32 PM2019-07-24T16:32:17+5:302019-07-24T16:32:32+5:30

whatsapp join usJoin us
Eng vs Ire: jason roy out on 5 run in his first test match | Eng vs Ire : 116 आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर मिळाली कसोटी पदार्पणाची संधी अन् 

Eng vs Ire : 116 आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर मिळाली कसोटी पदार्पणाची संधी अन् 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन - क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यानंतर इंग्लंडचा संघ प्रथमच मैदानात उतरला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील एकमेव चारदिवसीय कसोटी सामन्याला लॉर्ड्सवर सुरुवात झाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, आयर्लंडच्या गोलंदाजांनी यजमानांची अवस्था बिकट केली आहे. इंग्लंडचे तीन फलंदाज 36 धावांवर माघारी पाठवून आयर्लंडने सामन्यावरील पकड मजबूत केली आहे. या सामन्यात सर्वांचे लक्ष लागले होते ते 116 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेल्या जेसन रॉयकडे. रॉयचा हा पहिलाच कसोटी सामना होता, परंतु त्याला अपेक्षांवर खरे उतरता आले नाही.


नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत रॉयने 8 सामन्यांत 7 डावांमध्ये 443 धावा चोपून काढल्या होत्या. त्यात एक शतकाचा, तर चार अर्धशतकाचा समावेश होता. इंग्लंडच्या वर्ल्ड कप जेतेपदाच्या प्रवासात रॉयचा महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे त्याला कसोटी संघात पदार्पणाची संधी मिळाली, परंतु अवघ्या पाच धावा करून तो माघारी परतला. टीम मुर्ताघने पदार्पणाच्या सामन्यात रॉयची विकेट घेतली.

पाच वर्षांपूर्वी इंग्लंडकडून कसोटी पदार्पण अन् आज आयर्लंडकडून खेळणार; कोण आहे हा खेळाडू ?
लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर होणाऱ्या या लढतीत इंग्लंडचाच खेळाडू यजमानांच्या विरोधात मैदानावर उतरणार आहे. पाच वर्षांपूर्वी इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं पदार्पण केले होते आणि आज होणाऱ्या सामन्यात तो आयर्लंडचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जाणून घ्या कोण आहे तो...
बॉयड रँकिन असे या खेळाडूचे नाव आहे. त्याने इंग्लंड आणि आयर्लंड या दोन्ही देशांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आहेत. 6 फुट 7 इंच इतकी उंची असलेला रँकिन डावखुरा जलदगती गोलंदाज आहे. 5 जुलै 1984 मध्ये लंडन येथे त्याचा जन्म झाला होता. त्याने 2014 मध्ये इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. त्या एकमेव कसोटीत त्यानं 13 धावा देत एक विकेट घेतली होती. 


 

Web Title: Eng vs Ire: jason roy out on 5 run in his first test match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.