Join us

जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास

सलग दुसऱ्या विजयासह पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी आघाडीही घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 16:48 IST

Open in App

IND W vs ENG W 2nd T20I : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघानं इंग्लंडच्या ब्रिस्टलच्या मैदानात रंगलेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामना जिंकत नवा इतिहास रचला आहे. या विजयासह भारतीय महिला क्रिकेट संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी आघाडीही घेतली. पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्ज आणि अमनजोत कौर या दोघींनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडसमोर १८२ धावांचे टार्गेट सेट केले होते.  या धावांचा पाठलाग करताना यजमान इंग्लंड महिला संघ १५७ धावांपर्यंतच मजल मारू शकला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं

आतापर्यंत इंग्लंडच्या संघानं ब्रिस्टलच्या मैदानात खेळवण्यात आलेला एकही सामना गमावला नव्हता. पण त्यांची या मैदानातील बादशाहत टीम इंडियानं मोडून काढली. जे कुणाला जमलं नाही ते हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं करुन दाखवलं. भारतीय संघ याआधीही या मैदानात खेळला होता. पण दुसऱ्या सामन्यात संघाने इथं पहिल्या विजयाचा डाव साधला. भारतीय संघ टी-२० क्रिकेटमध्ये ब्रिस्टलच्या मैदानात इंग्लंडला पराभूत करणारा पहिला संघ ठरला आहे.     

IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!

ब्रिस्टलच्या मैदानातील इंग्लंडचा रेकॉर्ड

  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध - इंग्लंड संघाचा २२ धावांनी विजय (२०११)
  • पाकिस्तान विरुद्ध  इंग्लंड संघाचा ६८ धावांनी विजय (२०१६)
  • न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघाचा ७ विकेट्स राखून विजय (२०१८)
  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध - इंग्लंड संघाचा १७ धावांनी विजय (२०१९)
  • भारत विरुद्ध  इंग्लंड संघाचा ७ विकेट्स राखून विजय (२०२२)
  • भारत विरुद्ध  - इंग्लंड संघाचा २४ धावांनी पराभूत (२०२५)*

जेमिमासह अमनजोत कौरची अर्धशतके

इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात सलामीवीर स्मृती मानधनासह शेफाली वर्मा स्वस्तात माघारी फिरल्यावर जेमिमा रॉड्रिग्जनं ४१ चेंडूत ६३ धावांची दमदार खेळी केली. याशिवाय अमनजोत कौर (Amanjot Kaur) हिने ४० चेंडूत ६३ धावांची दमदार खेळी केल्याचे पाहायला मिळाले. अखेरच्या षटकात विकेट किपर बॅटर रिचा घोष हिने ३२ धावांची उपयुक्त खेळी केली. 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघमहिला टी-२० क्रिकेट