भारतीय कसोटी क्रिकेट एका नव्या वळवणावर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अनुभवी आर. अश्विन याने क्रिकेटमधून अचानक निवृत्तीची घोषणा केली. आता इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेआधी रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटला टाटा बाय बाय केले आहे. कसोटी क्रिकेटमधील नव्या पर्वात धुरंधर अन् अनुभवी खेळाडू एकापाठोपाठ एक 'आउट' होत असताना लवकरच मोहम्मद शमीवरही हीच वेळ येईल अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगताना दिसली. पण आता खुद्द मोहम्मद शमीनं यावर मौन सोडले आहे. भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीनं इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून निवृत्तीची अफवा पसरवणाऱ्यांना सुनावले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विराट-रोहित यांच्या निवृत्तीनंतर रंगणाऱ्या चर्चेवर भडकला शमी
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कसोटीतील निवृत्तीनंतर आता मोहम्मद शमीचा नंबर आहे, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळा रंगू लागल्याचे पाहायला मिळाले. काही वृत्तांमध्ये असा दावाही करण्यात आलाय की, आगामी इंग्लंड दौऱ्यात मोहम्मद शमीच्या नावाचा विचार केला जाणार नाही. विराट-रोहित यांच्यानंतर रंगणाऱ्या आपल्या निवृत्तीच्या चर्चेवर शमीनं संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे.
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
'खराब' स्टोरी असं म्हणत शमीनं घेतली अफवा पसरवणाऱ्यांची शाळा
मोहम्मद शमीनं इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून आपल्या निवृत्तीसंदर्भात भविष्यवाणी करणाऱ्या वृत्ताचा स्क्रीनशॉट शेअर केलाय. यासोबत त्याने खास कॅप्शनही लिहिलंय. व्हेरी वेल डन! महाराज आपल्या जॉबचे किती दिवस उरलेत तेही पाहा. मग आमचे बघा. तुम्ही तर आमचं वाटोळं लावायलाच बसलाय. कधीतरी चांगले बोलत जा. या आशयाच्या शब्दांत शमीने ही खराब स्टोरी असल्याचा उल्लेख खरत निवृत्तीच्या चर्चा ही फक्त अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.
अजूनही त्याच्या फिटनेसची देता येत नाही हमी
२०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनलनंतर दुखापतीमुळे शमी वर्षभर क्रिकेटपासून दूर राहिला. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून त्याने टीम इंडियात कमबॅक केले. या स्पर्धेत त्याने 'पंजा' मारला. पण पूर्वीच्या तुलनेत त्याच्या गोलंदाजीतील धार कमी झाल्याचे पाहायला मिळते. गोलंदाजी वेळी अनेकदा तो ब्रेक घेऊन डगआउटमध्ये बसल्याचेही पाहायला मिळते. त्यामुळे दुखापतीतून सावरून तो मैदानात उतरला असला तरी त्याच्यासंदर्भात फिटनेसचा मुद्दा चिंतेचा विषय असल्याचे दिसते.