Join us

स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

कधी अन् नेमकं काय घडलं? इथं पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 19:29 IST

Open in App

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टनच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. शुबमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात ५८७ धावांचा डोंगर रचल्यावर इंग्लंडचा अर्धा संघ अवघ्या ८७ धावांत तंबूत परतला. पण त्यानंतर हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ जोडीनं सहाव्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. या जोडीच्या दमदार खेळीसह हॅरी ब्रूकनं मारलेल्या एका फटक्यानं टीम इंडियातील खेळाडूंसह चाहत्यांची धकधक वाढवली होती. कारण त्याने मारलेला चेंडू थेड भारतीय कर्णधार शुबमन गिलच्या डोक्यावर लागल्याचे पाहायला मिळाले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

कधी अन् नेमकं काय घडलं? इथं पाहा व्हिडिओ

 

इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३७ व्या षटकात रवींद्र जडेजा गोलंदाजी करत होता. इंग्लंडकडून जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रूक ही जोडी मैदानात खेळत होती. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ब्रूकनं एक जोरदार फटका खेळला. चेंडू खूपच वेगाने आल्यामुळे शुबमन गिलला चेंडूचा अंदाज घेता आला नाही. झेल पकडण्याचा प्रयत्न करताना चेंडू त्याच्या डोक्यावर लागला. मग उप कर्णधार रिषभ पंत गिलकडे गेला. शुबमन गिलही डोके चोळताना दिसले. मैदानातील या घटनेनंतर फिजिओही मैदानात आल्याचे पाहायला मिळाले. हे दृश्य क्षणभरासाठी टीम इंडियातील ताफ्यातील खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांची धकधक वाढवणारे होते. पण सुदैवाने फिरकीपटू गोलंदाज असल्यामुळे गिलला मोठी दुखापत होण्याचा अनर्थ टळला. 

IND vs ENG : हॅरी ब्रूकच्या 'त्या' कृतीवर पंत, गिल भडकले, पंचांकडे केली तक्रार; नेमकं काय घडलं?

इंग्लंडचा अर्धा संघ स्वस्तात तंबूत परतला, पण...

भारतीय संघाने पहिल्या डावात उभारलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. पहिल्या डावात अर्धा संघ अवघ्या ८७ धावांत तंबूत परतला होता. पण त्यानंतर हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ या जोडीनं द्विशतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. दोघांनी शतके साजरी करत संघाला अडचणीतून बाहेर काढले. या दोघांची भागीदारी टीम इंडियाच्या विजयाआड येऊ शकते.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडशुभमन गिल