आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

शुबमन गिलचे तेवर; अगदी कोहलीसारखं सेलिब्रेशन अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 19:09 IST2025-06-24T18:55:00+5:302025-06-24T19:09:54+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ENG vs IND Shubman Gill Follows Virat Kohli’s Iconic Red Tee Look Under The Whites The prince truly follows the king Viral Pics | आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

Shubman Gill Follows Virat Kohli India vs England 1st Test : इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेतून शुबमन गिलच्या कॅप्टन्सीत भारतीय कसोटीच्या नव्या पर्वाची सुरुवात झालीये. लीड्सच्या मैदानातील हेडिंग्लेच्या मैदानात शुबमन गिल त्याच्या पहिल्या डावातील शतकी खेळीशिवाय मैदानातील खास गोष्टींमुळेही चर्चेत राहिल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंड दौऱ्याआधी विराट कोहलीनं कसोटीत निवृत्ती घेतल्यावर शुबमन गिलनं चौथ्या क्रमांकावर खेळताना फलंदाजीत धमक दाखवलीच. याशिवाय फिल्डवर शुबमन गिल  विराट कोहलीची कॉपी करतानाही दिसून आले. इथं जाणून घेऊयात त्यासंदर्भातील खास गोष्ट

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

शुबमन गिलचे तेवर; अगदी कोहलीसारखं सेलिब्रेशन


शुबमन गिल हा मैदानात आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. पण कॅप्टन्सीचे तेवर दाखवताना इंग्लंडच्या पहिल्या डावात त्याने सेम टू सेम विराट कोहलीच्या अंदाजात विकेटच सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. जो रुटच्या विकेट वेळी त्याने दाखवलेले तेवर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसले. पहिल्या डावात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर जो रुट विरोधात पायचितचे अपील करण्यात आले. अंपायरनं जो रूटला बाद दिल्यावर शुबमन गिलनं जसे कोहली सेलिब्रेशन करायचा तसे सेलिब्रेशन केले. पण जो रुटनं यशस्वी रिव्ह्यू  घेत आपली विकेट वाचवली. 

IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...

मग 'रेड अलर्ट' वाला Look

इंग्लंडच्या दुसऱ्या डावात शुबमन गिलनं माजी कर्णधार विराट कोहलीची आणखी एक गोष्ट कॉपी केल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवसाच्या खेळात शुबमन गिलनं व्हाइट जर्सीच्या आत लाल रंगाचा टी शर्ट घातला होता. विराटही याआधी अशा अवतारात दिसला आहे. त्यामुळे टीम इंडियातील प्रिन्स कर्णधार झाल्यावर किंग कोहलीला कॉपी करतोय असे काहीचे दृश्य दिसून आले. ज्याची सोशल मीडियावर चर्चाही रंगू लागली आहे. 

लाल रुमाल ते लाल टी शर्ट!

याआधी शुबमन गिल कसोटी सामन्यात लाल रुमाल खिशात घालून खेळतानाही दिसून आले आहे. लक फॅक्टरसाठी तो ही गोष्ट करायचा ही गोष्टही चर्चेचा विषय ठरली होती. आता कॅप्टन झाल्यावर लाल टी शर्टसह लक आजमावण्यासाठी त्याने कोहलीची कॉपी केलीये का? असा प्रश्न त्याचे व्हायरल होणारे फोटो पाहून क्रिकेट चाहत्यांना पडू शकतो. 

Web Title: ENG vs IND Shubman Gill Follows Virat Kohli’s Iconic Red Tee Look Under The Whites The prince truly follows the king Viral Pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.