शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय कसोटी क्रिकेटच्या नव्या पर्वाची सुरुवात अगदी धमाक्यात होईल, असे चित्र फलंदाजांच्या कामगिरीमुळे निर्माण झाले होते. पण क्षेत्ररक्षणातील चुकांमुळे लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानात टीम इंडियाला यजमान इंग्लंडच्या संघाने ५ विकेट्सनं पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात भारतीय संघाने जवळपास १० झेल सोडले. यात यशस्वी जैस्वाल सगळ्यात आघाडीवर होता. परिणामी टीम इंडियाच्या नावे ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा लाजिरवाण्या विक्रमाचीही नोंद झाली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यशस्वीच्या ४ झेलशिवाय या खेळाडूंनीही गमावली संधी
CricViz च्या आकडेवारीनुसार, २००६ पासून भारतीय संघाने एका कसोटी सामन्यात सर्वाधिक झेल सोडण्याची ही दुसरी वेळ आहे. यशस्वी जयस्वाल याने तिसरी स्लिप, चौथी स्लिप आणि गली क्षेत्रात तीन तर आउटफिल्डवर एक झेल सोडला. या चार झेलशिवाय जसप्रीत बुमराहनं आपल्या गोलंदाजीवर फॉलोथ्रूमध्ये ४ संधी गमावल्या. याशिवाय रवींद्र जडेजा आणि सिराजनं प्रत्येकी १-१ झेल टिपण्याची संधी गमावली.
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचं टेन्शन
स्लिपमध्ये फिल्डिंगचीही असते खरी 'कसोटी'
हेडिंग्लेच्या मैदानातून भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात झालीये. स्लिपमध्येही नवे गडी पाहायला मिळाले. करुण नायर, अनुभवी केएल राहुल, कर्णधार शुबमन गिल आणि यसस्वी जयस्वाल ही मंडळी अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्लिपमध्ये फिल्डिंग करताना दिसून आले. करुण नायर पहिल्या कसोटीत फलंदाजीत छाप सोडण्यात कमी पडला. पण स्लिपमध्ये फिल्डिंगवेळी त्याने २ महत्त्वपूर्ण झेल टिपले. याशिवाय लोकेश राहुलनंही एक उत्तम झेल घेतल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडच्या मैदानात फलंदाजीप्रमाणे स्लिपमध्ये क्षेत्रक्षण करणाऱ्या खेळाडूलाही धैर्य दाखवणं महत्त्वाचे आहे. याआधी विराट कोहली, रोहित शर्मा शिवाय अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्यावर हे खेळाडू महत्त्वपूर्ण फिल्ड पोझिशनवर फिल्डिंग करताना दिसायचे.
याआधी इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मैदानातील कसोटी खराब क्षेत्ररक्षणाची नोंद
२००६ मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील मुंबईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी स्लिपसह अन्य ठिकाणी क्षेत्ररक्षणासह मिळून एकून १२ झेल सोडल्याचा रेकॉर्ड आहे. २००६ पासून उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, ही भारतीय संघाची क्षेत्ररक्षणातील सर्वात खराब कामगिरी आहे.