Marcus Trescothick Reacts On Possibility Of England Drawing Edgbaston Test : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात बॅझबॉल क्रिकेट खेळत प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडणाऱ्या इंग्लंडच्या संघासमोर भारतीय संघाने ६०८ धावांचे टार्गेट सेट केले आहे. पाचव्या आणि अखेरच्या दिवशी इंग्लंडच्या संघाला विजयासाठी ५०० पेक्षा अधिक धावा करायच्या आहेत. चौथ्या दिवसाच्या अखेरीस टीम इंडियाने यजमान संघाला तीन धक्के देत बॅकफूटवर ढकलले. एजबॅस्टनच्या मैदानात ऐतिहासिक विजय नोंदवण्यासाठी टीम इंडिया फक्त ७ विकेट्स दूर आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? बॅटिंग कोच म्हणाले की,..
इंग्लंडचा संघ अखेरच्या दिवशी सामना वाचवण्यासाठी खेळणार असल्याचे संकेत सघांचे फलंदाजी प्रशिक्षक मार्कस ट्रेस्कोथिक यांनी दिले आहेत. बॅझबॉल खेळणारा इंग्लंडचा संघ आता मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार का? असा प्रश्न इंग्लंडच्या फलंदाजी कोचला विचारण्यात आला होता. यावेळी कोच म्हणाले की, ज्यावेळी परिस्थिती आव्हानात्मक असते त्यावेळी निश्चितच हा पर्याय निवडला जातो. आम्ही एवढेही मूर्ख नाही की, फक्त जिंकायचं किंवा हरायचं एवढाच विचार करुन मैदानात उतरतो. ड्रसिंग रूममध्ये खेळाडूंसोबत ड्रॉ संदर्भात चर्चा करत नाही. पण परिस्थितीनुसार संघातील खेळाडूंना रणनिती बदलून खेळण्याची मुभा निश्चितच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
इंग्लंडसाठी सामना अनिर्णत राखणं नाही सोपं, कारण...
इंग्लंडचा संघ हा सामना जिंकणार नाही, जे जवळपास स्पष्ट झाले आहे. पण सामना वाचवणंही त्यांच्यासाठी सोप नसेल. दिवसभर तग धरून खेळण्याची क्षमता असणारा जो रुट तंबूत परतला आहे. उर्वरित गड्यांमध्ये उत्तम फलंदाजी करण्याती धमक आहे. पण आक्रम शैली बाजूला ठेवून संयम दाखवणं त्यांच्यासाठी चॅलेंजिंग असेल. हीच टीम इंडियासाठी जमेची बाजू ठरते. भारत-इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील निकालाव पावसाचा काही परिणाम होणार का? तेही पाहण्याजोगे असेल. पावसाच्या व्यत्ययामुळे पाचव्या दिवसातील खेळ निर्धारित वेळेत सुरु होऊ शकलेला नाही. ढगाळ वातावरणात इंग्लंडमधील मैदानात गोलंदाजांचा जलवा पाहायला मिळतो. त्यामुळे सामना सुरु झाल्यावर भारतीय गोलंदाज याचा फायदा उठवणार का? तेही पाहण्याजोगे असेल.