Indian and England Players Wear Black Bands : लीड्सच्या हेडिंग्लेच्या मैदानातून भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्या नावाने ही द्विपक्षीय मालिका अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी खेळवण्यात येत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोन्ही संघातील खेळाडूंनी वाहिली अहमदाबाद-लंडन विमान अपघातग्रस्तांना श्रद्धांजली
पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्याला सुरुवात होण्याआधी दोन्ही संघातील खेळाडूंनी अहमदाबाद येथील विमान अपघातात जीव गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. यासाठी दोन्ही संघातील खेळाडूंनी एका मिनिटांचे मौन बाळगले. एवढेच नाही तर दोन्ही संघातील खेळाडू आणि मैदानातील पंच दंडावर काळ्या रंगाची पट्टी घालून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.
अहमदाबाद-लंडन विमान अपघातातील मृत्यांना श्रद्धांजली
गुजरातची राजधानी अहमदाबाद येथून इंग्लंडची राजधानी लंडनच्या दिशेनं झेपावल्यावर एअर इंडियाचे विमान कोसळल्याची दुर्घटना १२ जून रोजी घडली होती. अहमदाबाद येथील विमान अपघातामध्ये २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते. या अपघातात एकूण २४१ जणांनी आपला जीव गमावला होता. भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्याला सुरुवात होण्याआधी या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.