बर्मिंगहॅमच्या मैदानात सुरु असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल याने पहिल्या डावातील द्विशतकानंतर दुसऱ्या डावात शतक झळकावले आहे. या खेळीसह त्याने भारतीय संघाला मजबतू आणि मॅच जिंकून देणारी आघाडी मिळवून दिलीये. एवढेच नाहीतर अनेक विक्रमही त्याने सेट केले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय फलंदाज
इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅमम कसोटी सामन्यातील पहिल्या डावात शुबमन गिलनं २६९ धावांची खेळी केली होती. त्यानंतर इंग्लंडच्या संघासमोर तगडे आव्हान सेट करण्यासाठी चौथ्या दिवसाच्या खेळातील दुसऱ्या डावात शुबमन गिलनं दमदार शतक झळकावले. सुनील गावसकर यांच्यानंतर एका कसोटी सामन्यात द्विशतकासह शतक झळकवणारा शुबमन गिल हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. गिल आधी लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी १९७१ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात १२४ आणि दुसऱ्या डावात २२० धावांची खेळी केली होती.
हा डाव साधणारा क्रिकेट जगतातील नववा फलंदाज ठरला गिल
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत फक्त नऊ फलंदाजांनी एका कसोटी सामन्यात द्विशतकासह शतकी कामगिरी करून दाखवली आहे. या कामगिरीसह शुबमन गिलनं दिग्गजांच्या पक्तींत एन्ट्री मारली आहे. गिल आणि गावकर या भारतीय फलंदाजांशिवाय. डग वॉल्टर्स, लॉरेन्स रो, ग्रेग चॅपेल, ग्रॅहम गूच, ब्रायन लारा, कुमार संगकारा आणि मार्नस लाबुशेन यांनी अशी कामगिरी नोंदवली आहे.
गिलच्या नावे झाले हे अन्य रेकॉर्ड
याशिवाय भारताकडून एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही आता त्याच्या नावे झालाय. कॅप्टन्सीतील पदार्पणाच्या सामन्यातही शुबमन गिलनं शतक झळकावले होते. यासह कर्णधाराच्या रुपात पहिल्या ४ डावात सर्वाधिक ५२४ * धावा करणारा तो कर्णधारही ठरला आहे. .