Team India Edgbaston Birmingham Record : भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टनच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया पहिल्या सामन्यातील पराभवाची परतफेड करत दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. पण ही वाटते तेवढी सोपी नसेल. यामागचं कारण टीम इंडियाचा बर्मिंगहॅमच्या मैदानातील रेकॉर्ड. इथं जाणून घेऊयात आतापर्यंत टीम इंडियानं बर्मिंगहॅमच्या मैदानात किती कसोटी सामने खेळले आहेत अन् कशी राहिलीय कामगिरी यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सलग तीन पराभवानंतर फाईट दिली, पण...
भारतीय संघाने १९६७ मध्ये एजबॅस्टनच्या मैदानात पहिला कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने १३२ धावांनी विजय मिळवला होता. १९७४ मध्ये टीम इंडिया इथं पुन्हा मैदानात उतरली. पण यावेळीही संघाच्या पदरी एक डाव आणि ७८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. १९७९ मध्ये रंगलेल्या कसोटी सामन्यातही भारतीय संघावर एक डाव आणि ८३ धावांनी पराभूत होण्याची वेळ आली होती. पहिल्या तीन सामन्यातील पराभवानंतर १९८६ मध्ये भारतीय संघाने पराभवाची मालिका खंडीत केली. याचा अर्थ विजय मिळाला असं नाही. पण पराभव टाळून भारतीय संघाने सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं.
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
...अन् पदरी पडला सर्वात मोठा पराभव
१९९६ मधील इंग्लंड दौऱ्या वेळी एजबॅस्टनच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या सामन्यात यजमान इंग्लंड संघाने भारतीय संघाला ८ विकेट्स राखून पराभूत केले होते. २०११ च्या दौऱ्यात भारतीय संघावर या मैदानात मोठी नामुष्की ओढावली होती. इंग्लंडच्या संघाने पुन्हा एकदा बर्मिंगहॅमचं मैदान मारताना टीम इंडियाला एक डाव आणि २४२ धावांनी पराभूत केलं होते. इंग्लंडमधील भारतीय संघाचा हा सर्वात मोठा पराभव आहे. २०१६ मध्ये भारतीय संघ पहिल्या विजयाच्या अगदी जवळ पोहचला होता. पण शेवटी संघाला ३१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. २०२२ मध्ये जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या मैदानात अखेरचा सामना खेळला होता. या सामन्याचा निकालही इंग्लंडच्या बाजूनेच लागला होता.
१२३ वर्षांचा दुष्काळ संपवण्याचं चॅॅलेंज
बर्मिंगहॅमच्या मैदानात आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यात टीम इंडियाला एकही विजय मिळवता आलेला नाही. १२३ वर्षांचा दुष्काळ संपवायचा असेल तर फलंदाजीत पहिल्या कसोटी सामन्यातील तोरा अन् गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणात सुधारणा करावी लागेल. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली संघ या मैदानातील पहिला विजय साकारत मालिकेत बरोबरी साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.
एजबॅस्टनच्या मैदानात कसा आहे इंग्लंडच्या संघाचा रेकॉर्ड
यजमान इंग्लंडच्या संघानं २०२४ पर्यंत या मैदानात खेळलेल्या ५५ पैकी ३२ सामन्यात विजय नोंदवला आहे. १३ सामने अनिर्णित राहिले असून १० सामन्यात इंग्लंडच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. जवळपास ५८ टक्के विनिंग पर्संटेजमुळे हे मैदान इंग्लंडसाठी लकी असल्याचे आकडेवारीतून दिसून येते.
Web Title: ENG vs IND 2nd Test Match Prediction Head to Head Record And Team India Edgbaston Birmingham Stats
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.