ENG vs IND 2nd Test Day 2 Ravindra Jadeja Iconic Sword Celebration भारत-इंग्लंड यांच्यातील बर्मिंगहॅमच्या 'लढाई'त नंबर वन ऑलराउंडर रवींद्र जडेजाने आपल्या फलंदाजीतील धमक दाखवत इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात 'तलवारबाजी'चा शो दाखवला. शुबमन गिलसोबत सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील २३ वे अर्धशतक झळकावले. अर्धशतक किंवा शतक केल्यावर जडेजा बॅट हवेत फिरवत 'तलवारबाजी'चा नजराणा पेश करत आनंद व्यक्त करतानाना अनेकदा पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या बॅटिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत होते. अखेर महत्त्वपूर्ण सामन्यात टीम इंडियासाठी दमदार खेळी करत त्याने ट्रोलर्सची बोलती बंद करणारी खेळी साकारलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात दुसऱ्यांदा दिसला जड्डूचा जलवा
बर्मिंगहॅमच्या मैदानात इंग्लंडचा तगडा रेकॉर्ड आहे. दुसरीकडे या मैदानात भारतीय संघ एकही सामना जिंकलेला नाही. रवींद्र जडेजासाठी हे मैदान खूपच खास आहे. कारण आपल्या कसोटी कारकिर्दीतील परदेशातील पहिले कसोटी शतक जडेजानं याच मैदानात ठोकले होते. २०२२ मध्ये जडेजानं या मैदानात १९४ चेंडूत १०४ धावांची खेळी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याला या मैदानात शतकी खेळी करण्याची संधी आहे.
कॅप्टन्सीत शतकी 'रोमान्स'! शुबमन गिलनं मारली विराटसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री
असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय बॅटर
बर्मिंगहॅमच्या मैदानात भारतीय संघाकडून सर्वोच्च भागीदारी करणाऱ्या जोड्यांमध्ये जडेजाचे नाव दोन वेळा दिसते. २०२२ च्या दौऱ्यात रिषभ पंतसोबत त्याने या मैदानात २२२ धावांची भागीदारी रचली होती. ही बर्मिंगहॅमच्या मैदानातील भारतीय संघाकडून करण्यात आलेली सर्वोच्च भागीदारी आहे. शुबमन गिलसोबत जड्डूनं १५० + भागीदारीसह या मैदानातील दुसऱ्या क्रमांकाची भागीदारी रचली. गावसकर आणि चौहान जोडीनं १९७९ च्या दोऱ्यात या मैदानात १२४ धावांची भागीदारी रचल्याचा रेकॉर्ड आहे. बर्मिंगहॅमच्या मैदानात दोन सर्वोच्च भागीदारीमध्ये वाटा उचलणारा जड्डू हा पहिला भारतीय बॅटर ठरलाय.