ENG vs IND 2nd Test Akash Deep Five Wicket Haul : बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात आकाश दीपनं आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करून दाखवलीये. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जेमी स्मिथची विकेट घेत त्याने पहिल्यांदाच पाच विकेट्सचा डाव साधला. पहिल्या डावात त्याने सर्वोत्तम गोलंदाजी करताना चार विकेट्स घेतल्या होत्या. पण एका विकेट्सनं त्याचा पाच विकेट्सचा डाव हुकला होता.
पहिल्या डावात एक विकेट्स कमी पडली दुसऱ्या डावात साधला पाच विकेट्सचा डाव
बर्मिंगहॅमच्या मैदानात भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेताना दुसऱ्या डावात त्याने इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत धाडला. या कामगिरीनंतर तो चांगलाच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. जेमी स्मिथ पाचवी विकेट घेतल्यावर ज्याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली त्या जसप्रीत बुमराहची भेट घेतली. हे दृश्य खूपच खास होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चौथ्या दिवशी दोन महत्त्वाच्या विकेट्स जेमी स्मिथची शिकार करत मारला पंजा
दुसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी सिराजनं झॅक क्रॉउलीच्या रुपात पहिले यश मिळवल्यावर आकाश दीपनं बेन डकेट आणि जो रुटला आपल्या जाळ्यात अडकवले. पाचव्या आणि अखेरच्या दिवशी पहिल्या सत्रातील दोन षटकात बॅक टू बॅक विकेट घेत आकाश दीपनं भारतीय संघाच्या विजयाचा मार्ग सोपा केला. जेमी स्मिथला ८८ धावांवर बाद करत आकाश दीपनं पाच विकेट्स पूर्ण केल्या.