ENG vs IND 1st Test Yashasvi Jaiswal Smashes Brilliant Hundred : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालनंलोकेश राहुलच्या साथीनं संघाला दमदार सुरुवात करून दिली. लोकेश राहुलसोबत ९१ धावांची भागीदारी करणाऱ्या यशस्वीनं कर्णधार शुबमन गिलसोबत शतकी भागीदारी करताना कसोटी कारकिर्दीतील आणखी एका शतकाला गवसणी घातली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आधी संयम दाखवला, मग त्याचा आक्रमक तोराही दिसला
पहिल्या सत्रात अगदी आपल्या शैलीच्या विरुद्ध खेळताना त्याने संयमी खेळी करत मैदानात तग धरला. मग गियर बदलत त्याने मोठा डाव साधला. १६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने त्याने १४४ चेंडूत शतक साजरे केले. शतकी खेळीनंत त्याने आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. कसोटी कारकिर्दीतील पाचव्या शतकासह त्याने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
गांगुलीसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये झाली एन्ट्री
यशस्वी जैस्वाल हा हेडिंग्लेच्या मैदानात शतकी खेळी करणारा पहिला सलामीवीर ठरला आहे. याआधी या मैदानात कोणत्याही भारतीय सलामीवीराला शतक झळकवता आले नव्हते. एवढेच नाही तर इंग्लंडमध्ये खेळताना पहिल्याच डावात शतकी खेळी करणारा तो पाचवा फलंदाज ठरला. याआधी मुरली विजय, विजय मांजरेकर, सौरव गांगुली आणि संदीप पाटील यांनी अशी कामगिरी केली होती.ॉॉ
यशस्वी खेळाला बेन स्टोक्सनं लावला ब्रेक
शतकी खेळी आधी मसल्समध्ये क्रॅम्पमुळे यशस्वी जैस्वाल त्रस्त झाल्याचेही पाहायला मिळाले. फिजिओकडून उजव्या हातावर आइस पॅक मसाज घेऊन तो लगेच पुन्हा खेळायला तयार झाला अन् त्याने शतक पूर्ण केले. यशस्वी जैस्वालनं शतक गाठलं की तो ही खेळी आणखी मोठी करण्यात माहिर आहे. पण बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर तो फसला अन् १०१ धावांवर तो क्लीन बोल्ड होऊन परतला.
इंग्लंड विरुद्ध तिसरे शतक
डावखुऱ्या युवा सलामीवीराने आपल्या कसोटी कारकिर्दीतील आतापर्यंत खेळलेल्या २० सामन्यात पाच शतके झळकावली आहेत. यातील ३ शतके त्याने इंग्लंड विरुद्ध ठोकली आहेत. यातील एक शतक हे वेस्ट इंडिज तर एक शतक हे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यात आले आहे.