भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने वयाच्या २३ व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये आपली परिपक्वता पुन्हा एकदा सिद्ध केलीये. इंग्लंडच्या मैदानात पहिला कसोटी सामना खेळताना अगदी संयमी अंदाजात त्याने खेळाला सुरुवात केली. त्यानंतर अगदी सेट झाल्यावर त्याने आपल्या तोऱ्यात बॅटिंग करत विक्रमी शतक झळकावले. या दरम्यान त्याने अनुभवी सलामीवीर लोकेश राहुलसोबत पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची जबरदस्त भागीदारी रचली. त्यानंतर कर्णधार शुबमन गिलसोबत त्याने शतकी भागीदारी केली. त्याच्या या दिमाखदार खेळीशिवाय बॅटिंग वेळी त्याने कर्णधार शुबमन गिलशी साधलेला संवाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
"मेरी आदत है ..."
भारतीय संघाच्या पहिल्या डावातील ३८ व्या षटकात क्रिस वोक्सच्या गोलंदाजीवेळी यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांच्यात ताळमेळाचा अभाव दिसून आला. स्ट्राइकवर असलेल्या यशस्वी जैस्वालनं चेंडू मारल्यावर एक चौरटी धाव घेण्यासाठी क्रिज सोडले. पण नॉन स्ट्राइक एन्डवर असलेल्या शुबमन गिलनं धाव घेण्यास नकार देत त्याला पुन्हा माघारी धाडले. यावेळी यशस्वी जैस्वालनं कॅप्टन शुबमन गिलला एक खास विनंती करताना दिसून आले "मेरी आदत है आगे आने की..." अशा शब्दांत त्याने कॅप्टनला धाव घेण्यासाठी कॉल कर नकार दे. असे सांगताना दिसला. यशस्वी जैस्वालचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
नेमकं काय घडलं? यशस्वी आपल्या कॅप्टनला असं का म्हणाला?
चेंडू मारल्यावर धाव घेण्यासाठी पुढे येण्याची माझी सवय आहे. चोरटी धोकादायक धाव घेण्यापासून रोखण्यासाठी मला सातत्याने सांगत जा. अशी विनंती करण्यासाठी यशस्वी जैस्वालनं आपल्या कॅप्टनला खास विनंती केली. ही विनंती करण्याआधी तो क्या यार भैया..अशा अंदाजात धाव झाली असती असेही शुबमनला म्हणाला. पण शेवटी चूक मान्य करत ताळमेळातील अभाव टाळण्यासाठी त्याने मोठी जबाबदारी त्याने आपल्या कॅप्टनवर टाकल्याचे दिसून आले. ही गोष्ट नवा कॅप्टन आणि संघातील युवा सलामीवीर यांच्यातील बॉन्डिंगचा खास नजारा दाखवणारी होती.
यशस्वी- शुबमन गिल यांच्यात शतकी भागीदारी
यशस्वी जैस्वाल याने लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानात १०१ धावांची दमदार खेळी केली. या दरम्यान त्याने शुबमन गिलसोबत तिसऱ्या विकेटसाठी १२९ धावांची दमदार भागीदारी केली.