Shubman Gill Smashes First Century As Indian Test Captain : इंग्लंड विरुद्धच्या लीड्सच्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वाल पाठोपाठ टीम इंडियाचा नवा कर्णधार शुबमन गिल याच्या भात्यातूनही शतकी खेळी पाहायला मिळाले. शुबमन गिलनं १४ चौकाराच्या मदतीने १४० चेंडूत कसोटी कारकिर्दीतील सहाव्या शतकाला गवसणी घातली. कसोटी संघाचे नेतृत्व करताना पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने इंग्लडच्या मैदानात आपले पहिले शतक झळकावले आहे. SENA देशांतील ही त्याची ही पहिले शतक ठरले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकी दुष्काळ संपला
शुबमन गिल याने क्रिकेटच्या मैदानात खास छाप सोडत अल्पावधित टीम इंडियातील आपले स्थान पक्के केले. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात तो टीम इंडियाचा महत्त्वपूर्ण भाग झाला. इंग्लंड दौऱ्याआधी रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर कॅप्टन्सीची माळ त्याच्या गळ्यात पडली. पण एक चिंता ही होती, की इंग्लंडमध्ये त्याला धमक दाखवता आली नव्हती. SENA देशांत म्हणजेच दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या मैदानात कसोटीत त्याला छाप सोडता आली नव्हती. इंग्लंड दौऱ्यावर तो टीम इंडियाचा 'सेनापती' झाला अन् इंग्लंड विरुद्धच्या हेडिंग्ले कसोटीत शतकी खेळीसह त्याने SENA देशांत शतकी खेळीचा रिकामा रकाना पहिल्याच डावात भरला.
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना शतकी खेळीसह खास क्लबमध्ये मारली एन्ट्री
शुबमन गिल हा भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करताना पहिल्याच सामन्यात शतक झळकवणारा चौथा भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी विजय हजारे, सुनील गावसकर आणि विराट कोहली यांनी अशी कामगिरी करून दाखवली होती. एकंदरीत विचार करता कसोटी क्रिकेटमध्ये कॅप्टन्सी करताना पहिल्या डावात शतक झळकवणारा तो २३ वा खेळाडू आहे.
कसोटी संघाचे नेतृत्व करताना पहिल्या डावात शतक झळकवणारे भारतीय कॅप्टन
१६४* विजय हजारे विरुद्ध इंग्लंड, दिल्ली १९५१११६ सुनील गावसकर विरुद्ध न्यूझीलंड ऑकलंड १९७६११५ विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया अॅडिलेड २०१४१०२* शुबमन गिल विरुद्ध इंग्लंड, लीड्स २०२५