Join us

मित्रांपेक्षा शत्रूच जास्त बनवले : गंभीर

मी माझ्या करिअरमध्ये शत्रू बनवले पण, एक नक्की की मी रात्री शांत झोपत होतो. अशा भावना प्रसिद्ध क्रिकेटपटू गौतम गंभीरने व्यक्त केल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 07:07 IST

Open in App

नवी दिल्ली : मला चुकीच्या गोष्टी आणि ढोंगीपणा अजिबात सहन होत नाही. मी नम्र वागू शकलो असतो असे मला अनेकांनी सांगितले. मी माझ्या करिअरमध्ये शत्रू बनवले पण, एक नक्की की मी रात्री शांत झोपत होतो. अशा भावना प्रसिद्ध क्रिकेटपटू गौतम गंभीरने व्यक्त केल्या. आक्रमक खेळ व फटकळ स्वभावासाठी प्रसिद्ध असणारा गंभीर रविवारी क्रिकेट विश्वातून निवृत्त होत आहे. तो म्हणाला की, रोखठोक बोलण्याचा माझ्या करिअरवर प्रभाव पडला. पण मी काही चुकीचे होत असताना गप्प बसू शकत नाही, अशी कबुली गंभीरने दिली.

टॅग्स :गौतम गंभीर