Join us

ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

कसोटी मालिकेत कमबॅकसाठी शुबमन गिलच्या टीम इंडियानं सेट केलं ६०० प्लसचं टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 22:16 IST

Open in App

India vs England 2nd Test Day 4 : भारत-इंग्लंड यांच्यातील अँडसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील पहिला सामना गमावल्यावर मालिकेत कमबॅकसाठी टीम इंडियानं बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टनच्या मैदानात यजमान इंग्लंड संघासमोर ६०८ धावांचे टार्गेट सेट केले आहे. शुबमन गिलच्या शतकाशिवाय केएल राहुल, रिषभ पंत आणि रवींद्र जडेजाच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने ६ बाद ४२७ धावांवर डाव घोषित केला. पहिल्या डावातील १८० धावांच्या आघाडीसह टीम इंडियाने सेट केलेले मोठे आव्हान परतवणे इंग्लंडसाठी सोपे नाही. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडशुभमन गिललोकेश राहुलरवींद्र जडेजारिषभ पंत