संघाला विजयासाठी अखेरच्या षटकात ३५ धावांची गरज असताना आपला विजय पक्का असे गोलंदाजी करणाऱ्या संघाला वाटणे साहजिकच आहे. गोलंदाजानं कितीही वाईट गोलंदाजी केली, तर प्रतिस्पर्धी संघ काही जिंकत नाही, असा विश्वास निर्माण होण्यातही काहीच वावगे नाही. पण, हेच वाटणे व फाजिल विश्वास एका संघाला चांगलाच महागात पडला. ( Needing 35 to win off the final over, Ballymena's John Glass hit six sixes and his team won by three wickets)
नॉर्थन आयरीश क्रिकेट क्लब ग्रेगॅघ यांना हाताच सामना गमवावा लागला. LVS Twenty20 Trophy च्या अंतिम सामन्यात बॅलीमेना क्लबविरुद्धला अखेरच्या षटकात विजयासाठी ३५ धावांची गरज होती अन् जॉन ग्लास ( John Glass) सुसाट सुटला. त्यानं सहा चेंडूंत सहा षटकार खेचून संघाला अशक्यप्राय विजय मिळवून दिला.
बॅलीमेना संघाचा कर्णधार जॉन ग्लास हा ५१ धावांवर खेळत होता अन् संघाला अखेरच्या षटकात ३५ धावांची गरज असताना स्ट्राईकवर होता. त्यानं सहा सलग खणखणीत षटकार खेचले अन् नाबाद ८७ धावांसह संघाला विजय मिळवून दिला.
ग्रेगॅघ संघाच्या खेळाडूंना या पराभवावर विश्वासच बसत नव्हता. जॉन ग्लासला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार मिळाला. त्याच्या आनंदाला हेच कारण नव्हते. तर मोठा भाऊ सॅम यानं याच सामन्यात हॅटट्रिक घेतली. त्यानं ५ धावांत ३ षलंदाज बाद केले. ग्रेगॅघ संघानं २० षटकांत ७ बाद १४७ धावा केल्या होत्या.