Join us

ड्वेन ब्राव्होने केलं बॉलीवूडच्या अभिनेत्रीला प्रपोज, ती म्हणाली...

आपलं लग्न आयपीएलच्या उद्धाटन सोहळ्यासारखे भव्य दिव्य असणार आणि त्यामध्ये चीअरलीडर्स डान्सही करणार असल्याचे ब्राव्होने सांगितले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 19:15 IST

Open in App
ठळक मुद्देब्राव्होने या अभिनेत्रीला प्रपोज केल्यावर तिने पहिला प्रश्न विचारला की, आपण लग्न कुठे करायचं. याचं सुंदर उत्तर ब्राव्होने दिलं आहे.

मुंबई : वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो हा नेहमीच चर्चेत असतो. आपल्या दमदार खेळाबरोबर डान्ससाठीही तो प्रसिद्ध आहे. त्याबरोबर त्याने बॉलीवूडसाठी काही गाणीही गायली आहेत. काही दिवसांपूर्वी ब्राव्हो हा बॉलीवूडमध्ये एंट्री करणार असल्याच्याही बातम्या आल्या होत्या. पण आता तर ब्राव्होने बॉलीवूडच्या अभिनेत्रीला प्रपोज केल्याचे समजत आहे.

काही दिवसांपूर्वी ब्राव्हो आणि बॉलीवूडमधील सनी लिओनी यांचा एक डान्सचा व्हिडीओ चांगलाच वायर झाला होता. त्यानंतर एका गाण्यासाठी ब्राव्हो आणि एक बॉलीवूडची अभिनेत्री भेटली होती. या भेटीमध्ये ब्राव्होने हे प्रपोज केल्याचे समजत आहे.

ब्राव्होने या अभिनेत्रीला प्रपोज केल्यावर तिने पहिला प्रश्न विचारला की, आपण लग्न कुठे करायचं. याचं सुंदर उत्तर ब्राव्होने दिलं आहे. ब्राव्होने आपण स्टेडियममध्ये लग्न करायचं, असं तिला सांगितलं. त्याचबरोबर आपलं लग्न आयपीएलच्या उद्धाटन सोहळ्यासारखे भव्य दिव्य असणार आणि त्यामध्ये चीअरलीडर्स डान्सही करणार असल्याचे ब्राव्होने सांगितले.

आता ब्राव्होने नेमक्या कोणत्या बॉलीवूडच्या अभिनेत्रीला प्रपोज केले, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या अभिनेत्रीने यारिया (2014), इरादा (2017) आणि वीकेंड्स (2018) या सिनेमांमध्ये काम केले आहे. ही अभिनेत्री आहे राधिका बांगिया... 

टॅग्स :ड्वेन ब्राव्होबॉलिवूडआयपीएल