Join us

AUS vs WI, Ricky Ponting: लाईव्ह सामन्यात कॉमेंट्री करताना रिकी पाँटिंगची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल!

रिकी पाँटिंगची लाईव्ह सामन्यात कॉमेंट्री करताना अचानक तब्येत बिघडली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 15:55 IST

Open in App

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या संघाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगची लाईव्ह सामन्यात कॉमेंट्री करताना अचानक तब्येत बिघडल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खरं तर सध्या ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज (AUS vs WI Test) यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. या कसोटी सामन्यादरम्यान समालोचन करताना पॉटिंगच्या अचानक छातीत दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

रुग्णालयात दाखल! ऑस्ट्रेलियातील पर्थच्या ऑप्टस स्टेडियममध्ये हा सामना खेळला जात आहे आणि पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी लंचच्या वेळी ऑस्ट्रेलियन दिग्गजाला जवळच्या रूग्णालयात नेण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला रिकी पाँटिंग आता आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्ससाठी प्रशिक्षक म्हणून काम पाहतो. चॅनेल 7 च्या डेली टेलीग्राफच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, 'रिकी पाँटिंग आजारी आहे आणि त्यामुळे आजच्या उर्वरित कव्हरेजसाठी तो हजर राहू शकणार नाही."

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :आॅस्ट्रेलियावेस्ट इंडिजहॉस्पिटल
Open in App