Join us

अन् Musheer Khan यानं खेळला चतुर-चपळाईचा डाव! असा दूर केला विजयातील अडथळा

पहिल्या डावात १८१ धावांच्या खेळीसह संघाला मजबूत स्थितीत नेणाऱ्या मुशीर खान यानेच संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 17:42 IST

Open in App

Duleep Trophy 2024,  India A vs India B, 1st Match : दुलिप करंडक स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारत 'अ' संघावर पराभवाची नामुष्की ओढावली . अभिमन्यू ईश्वरन याच्या नेतृत्वाखालील 'ब' संघाने अखेरच्या दिवशी अ संघाला १९८ धावांवर रोखत हा सामना ७६ धावांनी जिंकला.

लोकेश राहुल लढला, पण अर्धी लढाई लढून परतला!

पहिल्या डावात १८१ धावांच्या खेळीसह संघाला मजबूत स्थितीत नेणाऱ्या मुशीर खान यानेच संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने फिल्डिंगमध्ये  चपळाई दाखवत विजय लांबणीवर टाकणाऱ्या आकाश दीपच्या खेळ खल्लास केला. भारत ब संघानं दिलेल्या २७४ धावांचा पाठलाग करताना भारत 'अ' संघाकडून लोकेश राहुलनं सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. 

आकाश दीपनं लढवला किल्ला, मुशीर खाननं कमालीच्या फिल्डिंगनं खेळ केला खल्लास

लोकेश राहुल बाद झाल्यानंतर आकाश दीपनं चिवट झुंज देत गोलंदाजांना दमवलं. भारत 'ब' संघाच्या विजयाच्या वाटेत तो अडथळा बनून उभा राहिला होता. त्याला मुशीर खान याने हुशारीनं रन आउट करत संघाच्या विजयाची प्रतिक्षा संपवली. आकाश दीपनं ४२ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ४३ धावा काढल्या. 

मुशीर खानचा जलवा!

पहिल्या डावात १८१ धावांची खेळीसह अनेक विक्रम प्रस्थापित करमारा मुशीर खान दुसऱ्या सामन्यात झिरो ठरला. पण त्याने पहिल्या डावात जी मोठी इनिंग खेळली त्या खेळीनं भारत ब संघ शेवटपर्यंत फ्रंटफूटवर राहिला. फलंदाजीत जलवा दाखवल्यानंतर जो आकाश दीप संघाच्या विजयात अडथळा ठरत होता त्याला चपळाईनं बाद करत मुशीर खान याने आपल्या फिल्डिंगमधीलही खास झलक दाखवून दिली आहे.  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघ