Join us

द्रविडच्या प्रेरणेमुळे नकारात्मक गोष्टींवर मात करता आली- मयंक अग्रवाल

मयंकने आॅस्ट्रेलियाविरुद्ध २०१८-१९ च्या कसोटी मालिकेत मेलबोर्न मैदानावर पदार्पण केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 01:25 IST

Open in App

बेंगळुरू : दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय संघात स्थान मिळविण्यात यशस्वी ठरलेला फलंदाज मयंक अग्रवाल याने महान फलंदाज राहुल द्रविड यांच्या प्रेरणास्पद गोष्टींमुळे नकारात्मक गोष्टींवर मार करणे शक्य झाले, असे म्हटले आहे.मयंकने आॅस्ट्रेलियाविरुद्ध २०१८-१९ च्या कसोटी मालिकेत मेलबोर्न मैदानावर पदार्पण केले होते. संजय मांजरेकर यांच्याशी क्रिकइन्फोवर बोलताना तो म्हणाला, ‘त्यावर्षी मी रणजी आणि भारतीय अ संघाकडून खेळताना मनसोक्त धावा काढल्या होत्या. मात्र भारतीय संघात स्थान मिळत नसल्याने निराशा पदरी पडते, असे राहुल द्रविड यांच्याशी बोलताना म्हटले होते. त्यांनी मला धीर दिला. सध्या लक तुझ्यासोबत नाही, असे सांगितले. तू मेहनत घेत इथपर्यंत आलास पण निवड तुझ्या हातात नाही, असेही म्हटले. मी त्यांच्या गोष्टीशी सहमत झालो. अशा गोष्टी सैद्धांतिकरीत्या समजू शकतात मात्र व्यावहारिकरीत्या मनाला पटत नाहीत.नकारात्मक भाव राखून खेळशील तर नुकसान तुझेच आहे, ही राहुल यांनी सांगितलेली गोष्ट मनात आहे.हीच बाब माझ्यासाठी प्रेरणादायी बनली. माझी संघात निवड झाली तेव्हा, फोन करून राहुल द्रविड यांंचे आभारही मानले होते.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :मयांक अग्रवालराहूल द्रविड