Join us

SL vs BAN सामन्यात मोठा वाद; स्पाईक दिसत असूनही नाबाद निर्णय, खेळाडूंचा अम्पायरला घेराव 

बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात मोठा वाद पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 10:28 IST

Open in App

Controvercy in SL vs BAN T20I Match ( Marathi News ) :  बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात मोठा वाद पाहायला मिळाला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ५ गडी गमावून १६५ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेश संघाने २ गडी गमावून १७० धावा केल्या आणि ११ चेंडू बाकी असताना ८ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात बिनुरा फर्नांडोने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली होती. बांगलादेशचा सौम्या सरकार त्याचा चेंडू लेग साइडने खेळण्याचा प्रयत्न करत होता,  पण तो चुकला आणि कीपरने तो पकडला. चेंडू व बॅट यांच्यात संपर्क झाल्याचा आवाज स्टम्प माईकमध्ये स्पष्टपणे ऐकू आला.

श्रीलंकेच्या खेळाडूंनी यासाठी अपील केले आणि मैदानावरील अम्पायर गाझी सोहेल यांनी सरकारला बाद घोषित केले. मात्र, सरकारने तिसऱ्या अम्पायरकडे दाद मागितली. रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसून आले की चेंडू बॅटच्या अगदी जवळ होता आणि या दरम्यान अल्ट्रा एजमध्ये स्पाइक देखील दिसला. पण स्पाइक पाहिल्यानंतर असे वाटले की, चेंडू बॅटपासून दूर गेल्याने स्पाइक झाला. यादरम्यान टीव्ही अंपायर मसुदुर रहमान म्हणाले की, मी स्पाइक पाहू शकतो, परंतु मला बॅट आणि बॉलमध्ये स्पष्ट अंतर दिसत आहे. अशा स्थितीत मी निर्णय घेईन की इथे चेंडू बॅटला लागला नाही.

यानंतर थर्ड अम्पायरने सोहेलला निर्णय बदलण्यास सांगितले आणि सरकारला नाबाद दिले गेले. सरकारला नाबाद देताच श्रीलंकेचे खेळाडू संतापले आणि सर्व खेळाडूंनी अम्पायरला घेराव घातला.  काही मिनिटे खेळ थांबवण्यात आला. श्रीलंकेचे प्रशिक्षकही या निर्णयावर खूश दिसले नाही. श्रीलंकेचे क्षेत्ररक्षक गोंधळ घालत राहिले. बऱ्याच चर्चेनंतर सर्व खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात परतण्याचे मान्य केले.  

टॅग्स :श्रीलंकाबांगलादेशटी-20 क्रिकेट