दिल्ली प्रीमियर लीग २०२५ च्या हंगामातील १८ व्या सामन्यात अखेरच्या षटकापर्यंत रंगत पाहायला मिळाली. पहिल्या तीन चेंडूत एका संघाच्या बाजूनं फिरलेला सामना पुढच्या तीन चेंडूत दुसऱ्या संघानं जिंकल्याचे पाहायला मिळाले. ज्या गोलंदाजाने या षटकात हॅटट्रिक घेतली तोच गोलंदाज संघासाठी खलनायक ठरला. कोणत्या दोन संघात रंगला होता सामना अन् हॅटट्रिकनंतर कोणत्या गोलंदाजानं घालवली मॅच जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
DPL मधील पहिली हॅटट्रिक, पण..
न्यू दिल्ली टायगर्स आणि साउथ दिल्ली यांच्यातील सामन्याचा निकाल अखेरच्या षटकात लागला. न्यू दिल्ली संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात धावफलकावर १९६ धावा लावल्या होत्या. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना साउथ दिल्ली संघ न्यू दिल्लीचा फिरकीपटू राहुल चौधरीमुळे अडचणीत आला. अखेरच्या षटकात त्याने पहिल्या तीन चेंडूवर तीन विकेट्स घेत हॅटट्रिकचा डाव साधला. पण पुढच्या तीन चेंडूत त्याने १२ धावा दिल्या अन् त्याची हॅटट्रिक वाया गेली.
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
अखेरच्या षटकातील ३ चेंडूत ३ विकेट्स अन्...
अखेरच्या षटकात ६ विकेट्स हातात असताना साउद दिल्लीच्या संघाला १२ धावांची गरज होती. राहुल गोलंदाजीला आला अन् त्याने पहिल्याच चेंडूवर सेट झालेल्या अनमोल शर्माला तंबूचा रस्ता दाखवला. त्याने ७९ धावांची खेळी केली. पुढच्या दोन चेंडूवर सुमित माथुर आणि गुलजार संधू यांना बाद करत राहुल चौधरीनं हॅटट्रिक पूर्ण केली. ही मॅच न्यू दिल्लीच्या बाजूनं झुकली असताना सामन्यात ट्विस्ट पाहायला मिळाले.
शेवटच्या ३ चेंडूत हव्या होत्या १२ धावा
हॅटट्रिक घेतल्यावर राहुल चौधरीनं चौथ्या चेंडूवर वाइडच्या रुपात अंवांतर धावांच्या रुपात एक चौकार दिला अन् सामन्यात पुन्हा ट्विस्ट आले. पुन्हा सामना साउथ दिल्लीच्या बाजूनं फिरला. अखेरच्या ३ चंडूत ७ धावांची गरज असताना अभिषक खंडेलवाल याने २ धावा घेतल्या. २ चेंडूत ५ धावांची गरज असताना षटकार मारत त्याने मॅच संपवली.