Join us  

राहुल द्रविडच्या 'त्या' सल्ल्यानं अजिंक्य रहाणेला दाखवली दिशा, भारताच्या उपकर्णधारानं सांगितला 12 वर्षांपूर्वीचा किस्सा

भारताचा महान फलंदाज राहुल द्रविड यानं दिलेल्या सल्ल्यानं कारकिर्दीला दिशा मिळाल्याचे मत अजिंक्य रहाणे यानं व्यक्त केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 12:00 PM

Open in App

भारताचा महान फलंदाज राहुल द्रविड ( Rahul Dravid ) यानं 2008-09च्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेदरम्यान दिलेल्या सल्ल्यानं कारकिर्दीला दिशा मिळाल्याचे मत भारतीय कसोटी संघाचा उप कर्णधार अजिंक्य रहाणे ( India's Test vice-captain Ajinkya Rahane) यानं व्यक्त केलं. द्रविडच्या त्या सल्ल्यानंतर अजिंक्यला प्रेरणा मिळाली आणि त्याचा खेळ आणखी सुधारला. राहुल द्रविड तेव्हा भारतीय संघातील सीनियर खेळाडू होता आणि त्याला युवा खेळाडूंच्या मानसिकतेबाबत माहित होतं. त्यामुळेच त्यानं अजिंक्यला फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रीत कर, भारतीय संघात निवड कधी होईल, यावर नको, असा सल्ला दिला.  5 महिन्यांत झाले वडील व भावाचे निधन; संकटावर मात करत चेतन सकारियाची टीम इंडियात एन्ट्री

"मला आजही आठवतंय, ती दुलीप ट्रॉफीची फायनल होती. 2008-09च्या फायनलमध्ये आम्ही दक्षिण विभागाविरुद्ध खेळत होतो आणि राहुल द्रविड तेव्हा चेन्नईत खेळत होता. त्या सामन्यात मी 165 व 98 धावा केल्या होत्या. सामन्यानंतर राहुल भाईनं मला बोलवून घेतलं आणि सांगितलं, मी तुझ्याबद्दल बरंच वाचलं आहे. तू भरपूर धावा केल्या आहेत. सातत्यानं धावा केल्यानंतर भारतीय संघात निवड व्हावी, असे वाटणे एक खेळाडू म्हणून साहजिक आहे. पण मी तुला सांगू इच्छितो की त्याचा जास्त विचार करू नकोस. खोऱ्यानं धावा करणं सुरूच ठेव,” असे अजिंक्यनं ESPNCricinfo ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. विराट कोहली, महेंद्रसिंग धोनीच्या संघातील ओपनर टीम इंडियाकडून खेळणार; पाच नवीन चेहरे संधीचं सोनं करणार!

त्यानं पुढे सांगितले, "तू तुझ्या खेळावरच लक्ष केंद्रीत केलंस तर भारतीय संघासाठी तुला स्वतःहून विचारणा केली जाईल. त्यामुळे निवडीमागे धाऊ नकोस, कामगिरीनंतर तेच तुझ्या मागे धावतील. राहुल द्रविडसारख्या खेळाडूकडून अशा प्रकारचा सल्ला मिळाल्यानं मला खूप प्रेरणा मिळाली. त्यानं अनेक चढउतार   पाहिले आहेत. पुढील पर्वात मी आणखी हजार धावा केल्या आणि त्यानंतर दोन वर्षांनी माझी भारतीय संघात निवड झाली.”

स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण धावा करूनही संधी मिळत नसल्यानं अजिंक्य तणावात गेला होता. रणजी करंडक स्पर्धेतील त्याच्या पहिल्या हंगामात सुरुवातीच्या सामन्यात त्याच्याकडून धावाही झाल्या नाही आणि त्याच्यावर संघातून वगळलं जाण्याची टांगती तलवार होती. पण, प्रविण आम्रेंनी मार्गदर्शन केलं अन् अजिंक्यचा फॉर्म परतला. “माझ्या पहिल्याच रणजी करंडक स्पर्धेतील सुरुवातीच्या तीन-चार सामन्यांत मला धावाच करता आल्या नव्हत्या. मला वगळलं गेलं पाहिजे, अशी लोकांमध्ये चर्चा सुरू झाली होती, परंतु तत्कालिन प्रशिक्षक प्रविण आम्रे यांनी मला धीर दिला. आम्ही खेळाडूला 7-8 सामन्यांत संधी देतो. त्यानंतर मी उर्वरित सामन्यात धावा केल्या. त्यानंतर पुढील पाच हंगामांत मी 1000 हून अधिक धावा करत राहिलो.  

टॅग्स :अजिंक्य रहाणेराहूल द्रविड