Join us

Padmakar Shivalkar : ४२ वेळा 'पंजा'; ६०० पेक्षा अधिक विकेट्स! तरी टीम इंडियात मिळाली नाही संधी

देशांतर्गत क्रिकेटमध्ये खास छाप सोडणारा महान फिरकीपटू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 11:48 IST

Open in App

Padmakar Shivalkar Passes Away At The Age Of 84 : देशांतर्गत क्रिकेटमधील भारताच्या सर्वोत्तम डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेलेले मुंबईच्या अनुभवी क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर यांचे सोमवारी वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी आपली खास छाप सोडली. पण दुर्देव हे की, ६०० पेक्षा अधिक विकेट्स घेऊनही या महान फिरकीपटूला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी काही मिळाली नाही.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

 ४२ वेळा पाच विकेट्स आणि १३ वेळा १० विकेट्स घेण्याचा पराक्रम

पद्माकर शिवलकर यांनी १९६१-६२ च्या हंगामात वयाच्या २१ वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. १९८७-८८ च्या हंगामापर्यंत त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला दबदबा दाखवून दिला. १२४ प्रथम श्रेणी सामन्यात त्यांनी ५८९ विकेट्स घेतल्या. यात  ४२ वेळा पाच विकेट्स आणि १३ वेळा १० विकेट्स घेण्याचा पराक्रमी विक्रम त्यांच्या नावे आहे. याशिवाय लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्यांच्या नावे १६ विकेट्स आहेत. 

BCCI नं २०१७ मध्ये जीवनगौरव पुरस्काराने केलं होत सन्मानित

१९७२-७३ च्या रणजी करंडक स्पर्धेतील त्यांची कामगिरी अविस्मरणीय अशी होती. तामिळनाडूविरुद्धच्या लढतीत १६ धावांत ८ आणि १८ धावांत ५ बळी घेत त्यांनी मुंबईच्या संघाला सलग १५ वे जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करून दाखवत ६०० पेक्षा अधिक विकेट्स घेऊनही त्यांना टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. पण २०१७ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं सीके नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या देशांतर्गत क्रिकेटमधील लक्षवेधी कामगिरीला दाद दिली होती.

टॅग्स :ऑफ द फिल्डभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय