Join us

"...तर कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसाला लाखाच्या घरात जाईल, कुणाला काळजी आहे का?"

सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 14:16 IST

Open in App

देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. बुधवार एका दिवसातील सर्वाधिक 45,720 कोरोना रुग्ण देशात सापडले आणि त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा 12 लाखांच्या वर गेला आहे. देशातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग संतापला आहे. त्यानं सोशल मीडियावर ट्विट करून त्याचा संताप व्यक्त केला.  

जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा 1 कोटी 53 लाख 90,252 इतका झाला आहे. त्यापैकी 93 लाख 67,463 रुग्ण बरे झाले असून 6 लाख 30,537 रुग्ण दगावले आहेत. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिका ( 41 लाख 01,000) आणि ब्राझील ( 22 लाख 31,871) यांच्यानंतर भारताचा क्रमांक येतो. भारतात 12 लाख  41,416 कोरोना रुग्ण आहेत आणि त्यापैकी 7 लाख 84,432 रुग्ण बरे झाले आहेत. पण, 29, 904 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाच्या या वाढत्या संख्येवर भज्जी संतापला. त्यानं ट्विट केलं की,'' लवकरच हा आकडा दिवसाला लाख इतका होईल... कुणाल काळजी आहे का?''  यापूर्वी भज्जीनं चिनी वस्तूवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं होतं. त्यानं चीनला खडेबोलही सुनावले होते.  

Love Story; हिंदू मुलीसोबत लग्न करण्यासाठी सोडलं पाकिस्तान अन् बनला यशस्वी क्रिकेटपटू! 

ICCच्या 'त्या' निर्णयामुळे महेंद्रसिंग धोनीसह 7 दिग्गज खेळू शकणार नाहीत वर्ल्ड कप! 

हिमेश रेशमियाच्या गाण्यावर हसीन जहाँनं तयार केला व्हिडीओ; नेटिझन्सनं विचारला 'भन्नाट' प्रश्न 

Video: मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला 'Sea lion'; पुढे जे घडलं तुम्हीच पाहा... 

भाजपा प्रवेशानंतर 24 तासांतच खेळाडूनं घेतला राजकारणातून संन्यास!

 

 

 

टॅग्स :हरभजन सिंगकोरोना वायरस बातम्या