Join us

तुम्हाला हे माहीत आहे का... भारताचा 'हा' गोलंदाज झाला निवृत्त

आता तो कंपनीमधून क्रिकेट खेळणार असला तरी भविष्यात त्याला आपण प्रशिक्षक व्हावं, असं वाटत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 14:53 IST

Open in App
ठळक मुद्देएकेकाळी भारतीय गोलंदाजीचा आधारस्तंभ असलेल्या एका खेळाडूने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

नवी दिल्ली : एकेकाळी भारतीय गोलंदाजीचा आधारस्तंभ असलेल्या एका खेळाडूने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता तो कंपनीमधून क्रिकेट खेळणार असला तरी भविष्यात त्याला आपण प्रशिक्षक व्हावं, असं वाटत आहे.

भारतासाठी तब्बल 13 वर्षे प्रवीण कुमार क्रिकेट खेळला. पण सध्याच्या घडीला त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळत नसल्याने त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. महेंद्रसिंग धोनी कर्णधार असताना प्रवीण कुमार हा भारताचा मुख्य गोलंदाज होता. भारताच्या गोलंदाजीचे सारथ्य तो करायचा. पण गेल्या काही वर्षांमध्ये मात्र त्याला भारतीय संघात संधी मिळालेली नव्हती.

निवृत्तीबाबत प्रवीण म्हणाला की, " मी निवृत्ती घेतली असली तरी त्याबाबत मला शल्य नाही. कारण मी मनापासून क्रिकेट खेळलो. खेळाशी प्रतारण मी कधीही केली नाही. त्यामुळे निवृत्ती घेत असताना माझ्या मनाला कसलीही बोच नाही. बरेच युवा गोलंदाज तयार होत आहेत. त्यांना संधी मिळावी, म्हणून मी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. "

टॅग्स :भारतमहेंद्रसिंह धोनी