भारतीय क्रिकेटमध्ये अनेक स्टार खेळाडू आहेत. मात्र, ३ खेळाडू असे आहेत ज्यांना आजपर्यंत वन डे आणि टी-२० क्रिकेटमध्ये एकदाही षटकार ठोकता आलेला नाही. यावर आपला विश्वास बसणे कठीन आहे. मात्र हे खरे आहे. तर जाणून घेऊयात कोण आहेत, हे स्टार क्रिकेटर...
कुलदीप यादव -टीम इंडियाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव भारतासाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट या तिनही स्वरूपात खेळतो. कसोटी क्रिकेटने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या कुलदीप यादवने अद्याप एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांत एकही षटकार खेचलेला नाही. कुलदीपने १०६ एकदिवसीय आणि ४० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अद्याप एकही षटकार खेचलेला नाही.
युजवेंद्र चहल -युजवेंद्र चहलने २०१६ मध्ये भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून, चहलला फलंदाजीसाठी जे काही चेंडू मिळाले आहेत, त्यांत त्याला एकही षटकार खेटता आलेला नाही. आतापर्यंत त्याने टी-२० क्रिकेटमध्ये १३ तर एकदिवसीय सामन्यात १४१ चेंडूंचा सामना केला आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, चहलने लिस्ट ए आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण ३ षटकार खेचलेले आहेत.
इशांत शर्मा -इशांत शर्माने आतापर्यंत भारतासाठी टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकही षटकार मारलेला नाही. इशांत शर्मा सध्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळत नाहीय. भारताकडून २००७ मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या इशांतने आतापर्यंतच्या कसोटी सामन्यात एकदाच षटकार खेचला आहे. त्याने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये २५६८ चेंडू खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत एक अर्धशतकही आहे. तिन्ही फॉरमॅट्स एकत्र करून, त्याने एकूण १९९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.