काहीही करा, आम्हाला नुकसान भरपाई द्या! कंगाल झालेल्या पीसीबीने जय शाहांकडे हात पसरले

पीसीबीने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाहीय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 11:16 IST2023-09-07T11:16:10+5:302023-09-07T11:16:45+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Do anything, compensate us! PCB extended its arms to Jai Shah, ACC on Asia Cup 2023 | काहीही करा, आम्हाला नुकसान भरपाई द्या! कंगाल झालेल्या पीसीबीने जय शाहांकडे हात पसरले

काहीही करा, आम्हाला नुकसान भरपाई द्या! कंगाल झालेल्या पीसीबीने जय शाहांकडे हात पसरले

आशिया कप २०२३ ला आता पैशांवरून वाद होण्याची चिन्हे आहेत. भारतीय संघाचे सामने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्याने ते श्रीलंकेत खेळविले जात आहेत. या हायब्रिड मॉडेलमुळे आधीच भिकेला लागलेली पाकिस्तानचे क्रिकेट बोर्ड आता आशियाई क्रिकेट काऊंसिलकडे नुकसान भरपाईची मागणी करत आहे. 

पीटीआयनुसार पीसीबीने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाहीय. परंतू, काही वृत्तांनुसार पीसीबीचे अध्यक्ष जका अशरफ यांनी एसीसीप्रमुख जय शाह यांना पत्र पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तसेच श्रीलंकेमध्ये मॅच ठरविण्यावरून देखील एसीसीचे वागणे ठीक नसल्याचे यात म्हटले आहे. 

5 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत दोन्ही यजमान देश आणि एसीसी सदस्यांनी हे सामने हंबनटोटा येथे आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर श्रीलंकेचे मुख्य क्युरेटर खेळपट्टी तयार करण्यासाठी तेथून रवाना झाले होते. हंबनटोटा येथे प्रसारणासाठी आवश्यक व्यवस्थाही करण्यात आली होती. एसीसीने पीसीबीलाही याची पुष्टी करणारा ईमेल पाठवला होता, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. परंतू या मेलचा विचार करू नये असे सांगण्यात आले होते. नंतर हे सामने कॅंडी आणि कोलंबोमध्ये आधीच्या वेळापत्रकानुसार आयोजित केले जातील अशी घोषणा करण्यात आली, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

आशिया कप 2023 मध्ये हे सामने अजून व्हायचे आहेत

9 सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, कोलंबो
10 सप्टेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो
12 सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध भारत, कोलंबो
14 सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो
15 सप्टेंबर: भारत विरुद्ध बांगलादेश, कोलंबो
17 सप्टेंबर: फायनल, कोलंबो
 

Web Title: Do anything, compensate us! PCB extended its arms to Jai Shah, ACC on Asia Cup 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.