Join us  

IND vs PAK मॅचमध्ये १० सेकंदाच्या ॲडसाठी ३० लाखांचा 'भाव', आशिया कपमध्ये ४०० कोटींची उलाढाल

सहा देशांमध्ये होत असलेल्या आशिया चषकाच्या स्पर्धेत कोट्यवधींची उलाढाल होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 5:51 PM

Open in App

नवी दिल्ली : सहा देशांमध्ये होत असलेल्या आशिया चषकाच्या स्पर्धेत कोट्यवधींची उलाढाल होणार आहे. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर ३० ऑगस्टपासून आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. २ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातून भारतीय संघ आपल्या अभियानाची सुरूवात करेल. आशिया चषकातील सलामीचा सामना यजमान पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुल्तान येथे खेळवला जाईल. लक्षणीय बाब म्हणजे कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान १० सेकंदाची जाहिरात चालवण्यासाठी तब्बल २५-३० लाख रूपये मोजावे लागणार आहेत. 

लिव्हमिंट या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, डिस्ने स्टार आशिया चषक २०२३ मधून जवळपास ४०० कोटी एवढी कमाई केवळ जाहिरातीच्या माध्यमातून करू शकते. आगामी स्पर्धेतील सर्व सामने डिस्ने स्टारवर मोफत पाहता येणार आहेत. दरम्यान, डिस्ने स्टार आशिया चषकातून जाहिरातीतून ३५०-४०० कोटी रूपये कमावण्याची शक्यता आहे. टीव्ही (स्टार स्पोर्ट्स नेटवर्क) आणि डिजिटल (डिस्ने+हॉटस्टार) या दोन्हींमध्ये आगामी क्रिकेट स्पर्धेसाठी १७ स्पॉन्सर्स आणि १०० हून अधिक जाहिरातदारांसोबत करार करण्यात आला आहे. 

आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा. (राखीव खेळाडू - संजू सॅमसन) 

आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे - ३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला१७ सप्टेंबर - फायनल

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध पाकिस्तानजाहिरात
Open in App