Join us

बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार

क्रिकेट जगतातील सर्वात छोटी अन् हटके नियम असणारी स्पर्धा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 22:07 IST

Open in App

Dinesh Karthik Surprise Return With Team India Captain : भारताचा अनुभवी विकेट किपर बॅटर दिनेश कार्तिक निवृत्तीनंतर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरण्यासाठी तयार झालाय. गत आयपीएल हंगामानंतर त्याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर तो  ज्या RCB संघाकडून अखेरचा हंगाम खेळताना दिसला त्या  ताफ्यात मेंटॉर आणि फलंदाजी प्रशिक्षकाच्या रुपात सामील झाला. आता पुन्हा एकदा तो क्रिकेटच्या मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे क्रिकेट जगतातील सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये तो भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल. इथं एक नजर टाकुयात तो कोणत्या स्पर्धेतून करतोय कमबॅक? त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघातून कुणाला मिळालीये संधी? त्यासंदर्भात सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

...अन् दिनेश कार्तिकला मिळाली  टीम इंडियाची कॅप्टन्सी

IPL सह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर दिनेश कार्तिक दक्षिण आफ्रिका टी-२० लीगमध्ये पार्ल रॉयल्स संघाकडून खेळताना पाहायला मिळाले होते. आता तो हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसेल. हाँगकाँग क्रिकेटनं सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली आहे. 

IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...

क्रिकेट जगतातील सर्वात छोटी अन् हटके नियम असणारी स्पर्धा 

१९९२ पासून हाँगकाँग सिक्सेस स्पर्धा खेळवली जाते. यंदाच्या हंगामात १२ संघ या स्पर्धेत सहभागी असून दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील भारतीय संघातून आर. अश्विनही मैदानात उतरणार आहे. प्रत्येक संघात ६ खेळाडू अन्  ६ षटकांचा सामना असे या स्पर्धेचे प्रारुप आहे. एका षटकात ८ चेंडू फेकले जातात. फलंदाासाठी ३१ धावांची मर्यादा आहे. म्हणजे ३१ धावा केल्या की, फलंदाजाला तंबूत परतावे लागते. पहिल्या हंगामासह १९९६ मध्ये भारतीय संघाने या स्पर्धेची फायनल गाठली पण संघाला यश आले नव्हते. २००५ मध्ये भारतीय संघाने ही स्पर्धा जिंकली होती.  ७ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत हाँगकाँगच्या मैदानात ही स्पर्धा रंगणार आहे.

टॅग्स :दिनेश कार्तिकभारतीय क्रिकेट संघआर अश्विन