भारतीय संघाचा माजी क्रिकेटर दिनेश कार्तिक हा सध्या इंग्लंडमधील द हंड्रेड स्पर्धेत कॉमेंटेटर अन् प्रेझेंटरच्या रुपात झळकतोय. आपल्या खास अंदाजातील शैलीत 'बोलंदाजी' करताना त्याने इंग्लंडमधील सामन्यावेळी क्रिकेट चाहत्यांनी केलेली मजेशीर तक्रार ऐकवताना दिसतोय. इंग्लंडमधील समर क्रिकेटमध्ये तिथल्या क्रिकेट चाहत्यांनी तीन चेहऱ्यांना हसतानाच पाहिलेले नाही, असे सांगत तो त्यातीलच एकाला यासंदर्भात प्रश्न विचारताना दिसून आले. दिनेश कार्तिकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
DK नं गंभीरचही घेतलं नाव
ट्रेंट ब्रिज येथील मैदानात ट्रेंट रॉकेट्स आणि मँचेस्टर ओरिजिनल्स यांच्यातील सामन्यानंतर दिनेश कार्तिकचा मजेशीर गप्पा गोष्टींचा व्हिडिओ समोर आलाय. अँडरसन - तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील भारत-इंग्लंड यांच्यातील सामन्या दरम्यान गौतम गंभीरच्या चेहऱ्यावर कधीच हास्य फुलल्याचे पाहायला मिळाले नाही, अशी तक्रार ब्रिटमधील चाहत्यांनी केलीये, असे दिनेश कार्तिक म्हणाला.
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
गंभीरसह नासीर हुसेनचं नाव घेत DK नं अँडी फ्लॉवर यांना मारला 'बाउन्सर'
ट्रेंट रॉकेट्स संघाचे कोच अँडी फ्लॉवर यांच्याशी संवाद साधताना दिनेश कार्तिक याने मजेशीर अंदाजात म्हणाला की, समर हंगामातील मॅचेस वेळी ३ लोकांच्या चेहऱ्यावर कधीच हास्य फुलल्याचे पाहायला मिळाले नाही, अशी तक्रार तमाम ब्रिटीश चाहत्यांची आहे. त्यासंदर्भात मी ट्विटही केलंय. भारतीय संघाचे कोच गौतम गंभीर, कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसलेला नासीर हुसेनसह त्याने तिसऱ्या व्यक्तीच्या रुपात अँडी फ्लॉवर यांचे नाव घेत त्याने कोचच्या रुपात डगआउटमध्ये असताना तुमच्या चेहऱ्यावर हास्य का दिसत नाही? असा प्रश्नही विचारला.
लोकांच सोड तू सांग मी कसा आहे?
इंग्लंडच्या संघाचे कोच राहिलेल्या फ्लॉवर यांनी DK च्या प्रश्नावर भन्नाट उत्तर दिले. "लोक मला चुकीचं समजतात, पण तू मला चांगले ओळखतोस." असे ते म्हणाले. यावर भारताच्या माजी क्रिकेटरनंही हो म्हणत विषय संपवला. दोघांच्यातील या मजेशी संवाद ऐकून इंग्लंडचा माजी जलगदती गोलंदाज डोमिनिक कॉर्क याला हसू अनावर झाल्याचेही पाहायला मिळाले.