Join us

IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह

माजी निवडकर्त्याचं रोहित-विराटसंदर्भात मोठ वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 14:58 IST

Open in App

Dilip Vengsarkar Questions Rohit Sharma Virat Kohli Selection : भारताचे दोन माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिकेतून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील मालिकेसाठी दोघांना संघात संधी मिळाली असली तरी आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत ते टिकणार का? हा मोठा प्रश्न चर्चेचा मुद्दा ठरतोय. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

माजी निवडकर्त्याचं रोहित-विराटसंदर्भात मोठ वक्तव्य

कारण BCCI निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी २०२७ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांच्या खेळण्यासंदर्भात संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यात आता माजी क्रिकेटर आणि निवडकर्ते दिलीप वेंगसरकर यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे संघात त्यांना घेतलेच कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थितीत केला आहे. ते नेमकं काय म्हणाले? जाणून घेऊयात सविस्तर

Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद वेंगसरकर यांनी रोहित-विराटसंदर्भात नेमकं काय म्हटलंय?

दिलीप वेंगसरकर यांनी 'मिड डे' ला दिलेल्या मुलाखतीत रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, रोहित आणि विराट कोहली हे दोघे महान खेळाडू आहेत. दोघांचे भारतीय क्रिकेटमध्ये मोठं योगदान आहे. पण सध्या ते फक्त एकाच प्रकारात खेळत आहेत. टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर ते बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहेत. या परिस्थितीत दोन्ही खेळाडूंचा फॉर्म आणि फिटनेसचा अंदाज लावणं कठीण आहे. दोघेही फिट आहेत. पण त्यांना संघात घेताना फॉर्मचा विचार करायला पाहिजे त्याचं काय? असा प्रश्न उपस्थितीत करत या जोडीची निवड फक्त अन् फक्त मागील कामगिरीच्या आधारावर झाल्याचे मत त्यांनी मांडले आहे.

संघात वर्णी लागली, पण रोहितची कॅप्टन्सी गेली

रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना हा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये खेळले होते. ९ मार्चला दुबईच्या मैदानात रंगलेल्या फायनलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंडच्या संघाला पराभूत करत ट्रॉफीवर नाव कोरले होते. या सामन्यात रोहित शर्मा सामनावीरही ठरला होता. आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून तो पुन्हा मैदानात उतरण्यास तयार आहे. पण संघात वर्णी लागली पण त्याने कॅप्टन्सी गमावली आहे. दोन्ही दिग्गज गिलच्या नेतृत्वाखालील खेळताना दिसतील.

English
हिंदी सारांश
Web Title : IND vs AUS: Fitness OK, but what about form? Asks Vengsarkar.

Web Summary : Dilip Vengsarkar questions Rohit and Virat's selection for the Australia ODIs. He highlights concerns about their form after a long break from cricket, suggesting their selection is based solely on past performance.
टॅग्स :भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२५भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघशुभमन गिल