आयपीएल २०२५ स्पर्धेत 'नोटबुक सेलिब्रेशनमुळे लक्षवेधी ठरलेला दिग्वेश राठी पुन्हा एकदा वादग्रस्त गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. IPL मध्ये शायनिंग मारण्याच्या नादात या फिरकीपटूनं कमाईतील बहुतांश पैसा दंडात्मक स्वरुपात घालवला. पण या त्याच्यात काहीच सुधारणा झाल्याचे दिसत नाही. दिल्ली प्रीमियर लीगमध्ये दिग्वेश राठीनं पुन्हा एकदा मैदानात राडा घातल्याचे पाहायला मिळाले. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अंपायर्संनी सोडवला वाद
दिल्ली प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामात दिग्वेश राठी हा साउथ दिल्ली सुपस्टार्स संघाकडून खेळत आहे. वेस्ट दिल्ली लायन्स विरुद्धच्या सामन्यात त्याने अंकित कुमार याच्यासोबत पंगा घेतल्याचे पाहायला मिळाले. दोघांच्यातील वाद सोडवण्यासाठी मैदानातील पंचांना मध्यस्थी करावी लागली.
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
नेमकं काय घडलं?
दिग्वेश विकेटलेस; अंकितनं पाडला बुक्का
या सामन्यात दिग्वेश राठीनं ४ षटकात ३३ धावा खर्च केल्या. ज्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. दुसरीकडे अंकित कुमारनं ४६ चेंडूत ९६ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्या भात्यातून ११ चौकार आणि ६ षटकार पाहायला मिळाले. दिग्वेश राठी हा आयपीएलमध्ये लखनौ सुपर जाएंट्स संघाचा भाग राहिला होता.