Join us

Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी

Digvesh Rathi 5 wickets in 5 balls, Video: फिरकी गोलंदाज दिग्वेश राठीने टी२० सामन्यात सलग ५ चेंडूत ५ बळी घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:37 IST

Open in App

Digvesh Rathi 5 wickets in 5 balls, Video: IPL 2025 मध्ये आपल्या धारदार गोलंदाजीसाठी आणि अनोख्या सेलिब्रेशनने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या दिग्वेश राठीने एका टी२० सामन्यात चमत्कार केला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लखनौ सुपरजायंट्सचा (LSG) युवा फिरकी गोलंदाज दिग्वेश राठीने स्थानिक टी२० सामन्यात सलग ५ चेंडूत ५ बळी घेतले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लखनौ सुपरजायंट्ससह संघाचे मालक संजीव गोयंका यांनीही त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

मॅच दरम्यान दिग्वेश राठीने सलग पाच चेंडू टाकले आणि प्रत्येक चेंडूवर बळी टिपला. त्याने फक्त एका षटकात अर्ध्या संघाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यापूर्वी श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चार चेंडूत चार बळी घेतले होते. परंतु आता राठीने त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन पाच बळी घेतले आहेत. दिग्वेशने स्थानिक सामन्यात हा पराक्रम केला.

व्हिडिओमध्ये दिसते की, राठीने प्रत्येक चेंडूवर फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. फलंदाजांना त्याची गुगली आणि फ्लिपर बॉल समजूच शकले नाहीत. फलंदाज सतत बाद होत राहिले. दिग्वेश राठीने IPL 2025 मध्ये LSG कडून खेळताना १३ सामन्यात १४ बळी घेतले. तो त्याच्या खास "नोटबुक सेलिब्रेशन"साठी देखील खूप प्रसिद्ध आहे. विकेट घेतल्यानंतर तो हे सेलिब्रेशन करत होता. त्याचे हे सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरला. पण त्यामुळे त्याच्यावर अनेकदा दंडाची कारवाईही झाली.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५लखनौ सुपर जायंट्सटी-20 क्रिकेट