बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौटेला ( Bollywood actress Urvashi Rautela) आणि भारताचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Indian cricketer Rishabh Pant) यांच्या प्रेमाच्या चर्चा अनेकदा रंगल्या आहेत. 2019मध्ये या दोघांना सोबत पाहिलं गेलं होतं आणि तेव्हा त्यांच्या प्रेमाच्या चर्चांनी अधिक जोर धरला होता. या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अजून कुठेच जाहीर विधान केलेले नाही. काही वृत्तांनुसार उर्वशीला भेटण्यासाठी रिषभने 16-17 तास वाट बघितली होती.
एका न्यूज पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार रिषभला बॉलिवूड अभिनेत्रीला भेटण्यासाठी 16-17 तास प्रतीक्षा पाहावी लागली होती. उर्वशी वाराणसी येथे एका प्रोजेक्टच्या शूटींगसाठी आली होती आणि तिचं शूटींगचं वेळापत्रक खूपच व्यग्र होतं. त्यामुळे तिच्याकडे कोणाला भेटण्यासाठी वेळच नव्हता. रिषभला जेव्हा उर्वशी वाराणसी येथे आहे असे समजले तेव्हा त्याने तिला भेटण्याचे ठरवले. तिला भेटण्यासाठी त्याला 16-17 तास वाट पाहावी लागली होती.
या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चांमध्ये किती तथ्य आहे हे ही दोघंच सांगू शकतात. उर्वशी रौतेला हिला 2021च्या मिस युनिव्हर्स च्या प्लॅटफॉर्मवर जज म्हणून पाहिलं गेलं होतं.
रिषभ पंतची गर्लफ्रेंड इशा नेगी
२०१९ या वर्षांच्या सुरुवातीला रिषभ पंतने सोशल मीडियावर इशा नेगीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्या दरम्यान दोघेही सुट्टीवर होते. त्यानंतर पंतने जाहीरपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली. इशा नेगी ही मूळची उत्तराखंडमधील देहरादूनची आहे. ती व्यवसायाने इंटिरियर डिझायनर आहे. इशा नेगी तिच्या ग्लॅमरस लूकसाठी इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. इशा तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेकदा स्टायलिश फोटो शेअर करत असते. काही पोशाख पाश्चिमात्य असतात तर काही वेळा ती पारंपारिक पोशाखातही फोटो पोस्ट करते. इशाचा जन्म २० फेब्रुवारी १९९७ ला देहरादूनच्या एका उच्चभ्रू कुटुंबात झाला.
इशा श्रीमंत राजपूत कुटुंबातून असून तिचे वडील यशस्वी उद्योजक आणि व्यावसायिक आहेत. Fab X इंजिनिअरिंग असे त्यांच्या कंपनीचे नाव आहे. इशाचे शालेय शिक्षण देहरादूनमधील एका कॉन्व्हेंट शाळेत तर नॉयडाच्या अमिटी महाविद्यालयातून ती कला शाखेची पदवीधर आहे. पदवीचे शिक्षण झाल्यावर तिने इंटेरिअर डिझायनिंगचं शिक्षण घेतलं असून ती स्वत:देखील एक यशस्वी उद्योजिका आहे.