Join us

एक कोटी फॉलोअर्स असलेला धोनी फक्त 'या' दोघांनाच करतो फॉलो

इन्स्टाग्रामवर तर धोनीला एक कोटी 10 लाख एवढे फॉलोअर्स आहेत. पण धोनी मात्र फक्त दोन जणांचा फॉलो करतो. या दोन व्यक्ती तुम्हाला माहिती आहेत का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 16:54 IST

Open in App
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी धोनीने कबड्डी आणि टेनिस हे दोन्ही खेळ खेळल्याचे पाहायला मिळाले होते.इन्स्टाग्रामवर धोनीने झिवाबरोबरचा एक व्हिडीओही आज शेअर केला आहे.या व्हिडीओमध्ये झिवा धोनीला डान्स शिकवत असल्याचे पाहायला मिळाले आहे.

मुंबई : महेंद्रसिंग धोनीचे बरेच चाहते आहेत. इन्स्टाग्रामवर तर धोनीला एक कोटी 10 लाख एवढे फॉलोअर्स आहेत. पण धोनी मात्र फक्त दोन जणांचा फॉलो करतो. या दोन व्यक्ती तुम्हाला माहिती आहेत का...

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना पुण्यात खेळवण्यात आला. या सामन्यापूर्वी भारतीय ट्वेन्टी-20 संघाची घोषणा करण्यात आली. या संघातून धोनीला वगळण्यात आले. त्यामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला असला तरी धोनी मात्र आपल्या घरी विश्रांती घेत आहे. काही दिवसांपूर्वी धोनीने कबड्डी आणि टेनिस हे दोन्ही खेळ खेळल्याचे पाहायला मिळाले होते. सध्याच्या घडीला धोनी मुलगी झिवाला जास्तीत जास्त वेळ देत असल्याचे पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्रामवर धोनीने झिवाबरोबरचा एक व्हिडीओही आज शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये झिवा धोनीला डान्स शिकवत असल्याचे पाहायला मिळाले आहे.

धोनी इन्स्टाग्रामवर फक्त दोन जणांनाच फॉलो करत असल्याचे तुम्ही पाहिले असेत. या दोन व्यक्ती कोण, असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. या दोनपैकी पहिली व्यक्ती म्हणजे बॉलीवूडचे बादशाह अमिताभ बच्चन. धोनी हा बच्चन यांचा फॅन असल्यामुळे त्याने इन्स्टाग्रामवर त्यांना फॉलो केले आहे. या यादीतील दुसरे नाव वाचल्यावर तुम्हाला मोठा धक्का बसेल. कारण धोनी अमिताभ यांच्याबरोबर झिवाला फॉलो करत असल्याचे पुढे आले आहे.

Video - ... आता धोनी घेणार झिवाकडून धडे

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीइन्स्टाग्राम