Join us  

धोनी@400! धोनीचे यष्टीमागे 400 बळी पूर्ण, हा फलंदाज ठरला 400 वी शिकार 

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांदरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान महेंद्र सिंग धोनीने विक्रमांचे अजून एक शिखर सर केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2018 10:24 PM

Open in App

केप टाऊन - भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांदरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान महेंद्र सिंग धोनीने विक्रमांचे अजून एक शिखर सर केले आहे. गेली 14 वर्षे टीम इंडियामध्ये यष्टीरक्षणाची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या धोनीने यष्टींमागीला आपले 400 बळी पूर्ण केले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार मार्कराम धोनीची यष्टीमागील 400वी शिकार ठरला. भारताने दिलेल्या मोठ्या आव्हानाच पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला अमलाच्या रूपात सुरुवातीलाच मोठा धक्का बसला होता. त्यानंतर कर्णधार मार्कराम आणि डुमिनी यांनी यजमान संघाला सावरले. मात्र कुलदीप यादव टाकत असलेल्या 17 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मार्कराम चकला आणि यष्टीमागे सज्ज असलेल्या धोनीने त्याच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. धोनीने आपल्या कारकिर्दीतील 315 व्या सामन्यात यष्टीमागील 400 बळींचा टप्पा ओलांडला आहे. या बळींमध्ये 294 झेल आणि 106 यष्टीचीतचा समावेश आहे. यष्टीमागे सर्वाधिक शिकार करणाऱ्यांच्या यादीत धोनी चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत श्रीलंकेचा कुमार संगकारा अव्वलस्थानी तर अॅडम गिलख्रिस्ट दुसऱ्या स्थानी आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर तिसऱ्या स्थानावर आहे. 

टॅग्स :एम. एस. धोनीक्रिकेटभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८भारतीय क्रिकेट संघ