Join us

धवनचे आक्रमक अर्धशतक, भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 204 धावांचे आव्हान 

पहिल्या टी-20 लढतीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 204 धावांचे आव्हान ठेवले आहे.  सलामीवीर शिखर धवनने केलेली आक्रमक अर्धशतकी खेळी आणि इतर फलंदाजांनी केलेल्या छोट्या पण उययुक्त खेळींच्या जोरावर भारतीय संघाने...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2018 19:57 IST

Open in App

जोहान्सबर्ग - पहिल्या टी-20 लढतीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 204 धावांचे आव्हान ठेवले आहे.  सलामीवीर शिखर धवनने केलेली आक्रमक अर्धशतकी खेळी आणि इतर फलंदाजांनी केलेल्या छोट्या पण उययुक्त खेळींच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 5 बाद  203 धावा फटकावल्या. मात्र शिखर धवच्या फटकेबाजीनंतर मधल्या फळीतील फलंदाजांना वेगाने धावा जमवता न आल्याने भारतीय संघाला अजून मोठी धावसंख्या उभारता आली नाही. 

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर रोहित शर्मा आणि शिखर धवनने भारताला तडाखेबंद सुरुवात करून दिली. मात्र रोहित शर्मा झटपट 21 धावा काढून दालाची शिकार झाला. दीर्घकाळानंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या सुरेश रैनानेही सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. मात्र तोही 15 धावा काढून माघारी परतला. त्यानंतर धवन आणि विराट कोहलीने आफ्रिकेच्या गोलंदाजांना धुवून काढले. यादरम्यान, विराटला एक जिवदानही मिळाले. भारतीय संघाचे शतक नवव्या षटकातच फलकावर लागले. पण विराट कोहली (26) शम्सीची शिकार झाला आणि भारताच्या डावास ब्रेक लागला. विराटपाठोपाठ शिखर धवनही (72) बाद झाला. दोन खंदे फलंदाज माघारी परतल्यावर मनीष पांडेने सावध पवित्रा घेतला. अखेर मनीष पांडे ( नाबाद 29), महेंद्रसिंग धोनी (16) आणि हार्दिक पांड्या ( 13) यांनी भारताला दोनशेपार मजल मारून 

टॅग्स :शिखर धवनभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८क्रिकेट