Join us  

Devdutt Padikkalने २० चेंडूंत ९२ धावा चोपल्या, शतक झळकावत महाराष्ट्राच्या गोलंदाजांची केली धुलाई

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा देवदत्त पडिक्कल ( Devdutta Padikkal) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचा हिरो ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 6:30 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा देवदत्त पडिक्कल ( Devdutta Padikkal) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचा हिरो ठरला. कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने महाराष्ट्राच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याच्या नाबाद १२४ धावांच्या जोरावर कर्नाटकने २ बाद २१५ धावांचा डोंगर उभा केला. मनिष पांडे यानेही अर्धशतकी खेळी करताना धावसंख्येत हातभार लावला.

कर्णधार मयांक अग्रवाल व देवदत्त सलामीला आले. मयांक २८ धावांवर माघारी परतल्याने ३४ धावांवर कर्नाटकला पहिला धक्का बसला. त्यानंतर देवदत्त व मनिष यांनी दुसऱ्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी केली. मनिष ३८ चेंडूंत १ चौकार व ४ षटकार खेचून ५० धावांवर बाद झाला. देवदत्त मात्र अखेरपर्यंत फटकेबाजी करत राहिला. त्याने ६२ चेंडूंत नाबाद १२४ धावा चोपल्या. त्यात १४ चौकार व ६ षटकार अशा ९२ धावा या केवळ २० चेंडूंत आल्या. कर्नाटकने २ बाद २१५ धावा केल्या. महाराष्ट्राचा आर हंगर्गेकर याने ४ षटकांत ५०, आर घोषने ४ षटकांत ५८ धावा दिल्या.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :देवदत्त पडिक्कलटी-20 क्रिकेटमहाराष्ट्रकर्नाटक
Open in App